सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ (१४ नोव्हेंबर, १९४७ - ४ जानेवारी, २०२२) या भारतीय सामाजिक कार्यकर्त्या होत्या. त्या विशेषतः भारतातील अनाथ मुलांचे संगोपन करण्याच्या कार्यासाठी ओळखल्या जातात. त्यांना २०२१ मध्ये सामाजिक कार्य श्रेणीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[२][३]
सिंधुताई सपकाळ | |
---|---|
जन्म |
१४ नोव्हेंबर, इ.स. १९४७ |
मृत्यू |
४ जानेवारी, २०२२ (वय ७४) पुणे, महाराष्ट्र |
मृत्यूचे कारण | हृदयाघात |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
टोपणनावे | चिंधी |
नागरिकत्व | भारतीय |
पेशा | सामाजिक कार्यकर्त्या |
धर्म | हिंदू |
जोडीदार | श्रीहरी सपकाळ |
अपत्ये | १ |
वडील | अभिमन्यू साठे |
पुरस्कार | डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१] पद्मश्री पुरस्कार (२०२१) |
जन्म आणि सुरुवातीचे जीवन
सिंधुताईंचा जन्म १४ नोव्हेंबर १९४८, वर्धा जिल्ह्यातील पिंप्री मेघे गावात आणि ब्रिटिश भारतातील बेरार येथील अभिमन्यू साठे या गुराख्याच्या घरी झाला.[४][५] एक अवांछित मूल असल्याने, त्यांचे नाव चिंधी ("फाटलेल्या कापडाचा तुकडा") ठेवले.पण हीच चिंधी अनेक फाटक्या ठिगळांना जोडते याचा त्यावेळी कोणी विचार ही केला नसेल.अत्यंत गरिबी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि लवकर लग्न यामुळे त्यांना चौथी इयत्ता उत्तीर्ण झाल्यानंतर शाळा सोडावी लागली.
सपकाळ यांचे वयाच्या १२व्या वर्षी श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न झाले, जे त्यांच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. लग्नानंतर त्या वर्ध्यातील सेलू येथील नवरगाव गावात गेल्या. हे लग्न फार काळ टिकले नाही आणि वयाच्या २० व्या वर्षी, त्यांना त्यांच्या मुलीसोबत नवऱ्याने सोडून दिले.[६][७]
विवाह
विवाह वयाच्या ९ व्या वर्षी वयाने २६ वर्षांनी मोठे असलेल्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी झाला. घरी प्रचंड सासुरवास होता. कुटुंबात शैक्षणिक वातावरण नाही. जंगलात लाकूडफाटा, शेण गोळा करताना सापडलेले कागदाचे तुकडे माई घरी आणायच्या आणि उंदराच्या बिळांत लपवून ठेवायच्या. क्वचित घरी एकट्या असल्या तर त्या अभ्यास करण्याचा प्रयत्न करीत.[ संदर्भ हवा ][८]
अठराव्या वर्षापर्यंत माईंची तीन बाळंतपणे झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या आयुष्यातला पहिला संघर्ष केला. तेव्हा गुरे वळणे हाच व्यवसाय असायचा. गुरेही शेकड्यांनी असायची. त्यांचे शेण काढता काढता बायकांचे कंबरडे मोडायचे. शेण काढून बाया अर्धमेल्या व्हायच्या. पण त्याबद्दल कोणतीही मजुरी मिळायची नाही. रस्त्यावर मुरूम फोडणाऱ्यांना मजुरी, पण शेण काढणाऱ्यांना नाही. या शेणाचा लिलाव फॉरेस्टवाले करायचे. इथे सिंधुताईंनी बंड पुकारले आणि लढा सुरू केला. त्यामुळे या लिलावात ज्यांना हप्ता मिळायचा त्यांच्या हप्त्यावर गदा आली. हा लढा जिंकल्या पण त्यांना या लढ्याची जबर किंमत चुकवावी लागली. बाईंच्या या धैर्याने गावातील जमीनदार, दमडाजी असतकर दुखावला गेला होता. जंगलखात्याकडून येणारी मिळकत बंद झाली.[ संदर्भ हवा ]
जीवनातील संघर्ष
दमडाजीने सिंधुताईंच्या पोटातील मूल आपले असल्याचा प्रचार सुरू केला. नवऱ्याच्या मनात त्यांच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला आणि पूर्ण दिवस भरलेल्या ताईंना त्याने बेदम मारून घराबाहेर काढले. गुरांच्या लाथा बसून मरतील म्हणून तशा अर्धमेल्या अवस्थेत त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. नवऱ्याने हाकलल्यानंतर गावकऱ्यांनीही हाकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या सिंधुताई माहेरी आल्या, पण सख्ख्या आईनेही पाठ फिरवली. परभणी-नांदेड-मनमाड रेल्वे स्टेशनांवर सिंधुताई भीक मागत हिंडायच्या. चतकोर भाकर, उष्टावलेले एखादे फळ हाती लागेल, म्हणून रात्रभर रेल्वे रुळांच्या कडेने फिरायच्या.एकदा जळगाव जिल्ह्यातील पिंपराळा स्टेशनवर त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही केला. पण ‘लहान मुलीचा जीव घेतला तर पाप लागेल’ म्हणून मागे फिरल्या. मग पुन्हा भीक मागत पोट भरणे सुरू झाले. सिंधुताई दिवसभर भीक मागायच्या आणि रात्री स्टेशनवरच झोपायच्या. पण तिथे त्यांनी कधी एकटे खाल्ले नाही. स्टेशनवरच्या सगळ्या भिकाऱ्यांना बोलावून त्या मिळालेल्या अन्नाचा काला करायच्या आणि मग सर्व भिकारी एकत्र बसून जेवायचे. त्यांनीच २१ वर्षांच्या ताईंना संरक्षण दिले. दोन दिवस काहीच भीक मिळाली नसल्याने त्यांच्या लक्षात आले की तिथे कायम राहता येणार नाही. शेवटी सिंधुताईंनी स्मशान गाठले.[ संदर्भ हवा ]
ममता बाल सदन
अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरू झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.[९]
सिंधुताई यांनी अन्य समकक्ष संस्थाही स्थापन केलेल्या आहेत त्या याप्रमाणे-
आंतरराष्ट्रीय पातळीवर
सिंधुताई यांनी आपल्या संस्थेच्या प्रचारासाठी आणि कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या हेतूने प्रदेश दौरे केले आहेत आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांनी आपल्या बोलण्याने आणि काव्याने समाजाला प्रभावित केले आहे. परदेशी अनुदान मिळणे सोपे जावे या हेतूने त्यांनी मदर ग्लोबल फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.[११]
मृत्यू
दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.
दिनांक ४ जानेवारी २०२२ रोजी पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये ह्रदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. मृत्यूच्या एक महिन्यापूर्वी त्यांचे हर्नियाचे ऑपरेशन झाले होते. त्यांना महानुभाव पंथाचा अनुग्रह होता. महानुभाव पंथाच्या नियमाप्रमाणे त्यांना भुमीडाग देण्यात आला.[६][१२]
२५ नोव्हेंबर २०२१ रोजी हॉस्पिटलमध्ये डायफ्रामॅटिक हर्निया शस्त्रक्रियेनंतर सपकाळ यांच्यावर शस्त्रक्रियेउत्तर काळजी घेण्यात येत होती.
पाच वर्षांहून अधिक काळ ग्रस्त असलेल्या डायफ्रामॅटिक हर्नियामुळे त्यांचे डाव्या बाजुचे फुफ्फुस व्यवस्थितरित्या कार्य करीत नव्हते. शस्त्रक्रियेनंतर त्यांची प्रकृती बरी झाली होती.
तथापि, पाच दिवसांपूर्वी त्यांना फुफ्फुसाचा संसर्ग वाढल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडू लागली, त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि दिनांक ०४ जानेवारी २०२२ रोजी सायंकाळी ८ वाजून १० मिनीटांना त्यांचे निधन झाले. पुणे येथील गॅलक्सी केर या दवाखान्यामध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला.[१३]
पुरस्कार व गौरव
सिंधुताईंना सुमारे ७५० राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.[९] त्यांतले काही :-
- पद्मश्री पुरस्कार (२०२१)[१४][१५]
- महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार (२०१२)[१]
- पुण्याच्या अभियांत्रिकी कॉलेजचा 'कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुरस्कार' (२०१२)
- महाराष्ट्र शासनाचा 'अहिल्याबाई होळकर पुरस्कार' (२०१०)
- मूर्तिमंत आईसाठीचा राष्ट्रीय पुरस्कार (२०१३)
- आयटी प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा दत्तक माता पुरस्कार (१९९६)
- सोलापूरचा डॉ. निर्मलकुमार फडकुले स्मृती पुरस्कार
- राजाई पुरस्कार
- शिवलीला महिला गौरव पुरस्कार.
- श्रीरामपूर-अहमदगर जिल्हा येथील सुनीता कलानिकेतन न्यासातर्फे कै सुनीता त्र्यंबक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'सामाजिक सहयोगी पुरस्कार' (१९९२)
- सीएनएन-आयबीएन आणि रिलायन्स फाउंडेशनने दिलेला 'रिअल हीरो पुरस्कार' (२०१२).
- २००८ - दैनिक लोकसत्ताचा 'सह्याद्रीची हिरकणी पुरस्कार'.
- प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार (२०१५)[१६]
- डॉ. राम मनोहर त्रिपाठी पुरस्कार (२०१७)[१७]
- पुणे विद्यापीठाचा 'जीवन गौरव पुरस्कार' [१०]
- पद्मश्री पुरस्कार (२०२१)[१८]
प्रसारमाध्यमांतील चित्रण
- सिंधुताईंच्या जीवनावर आधारलेला मी सिंधुताई सपकाळ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यात तेजस्विनी पंडित यांनी सिंधुताईंची भूमिका साकारली आहे.[१९]
- सिंधुताई सपकाळ यांच्या जीवनावर भार्गव फिल्म्स अँड प्रॉडक्शनचा ’अनाथांची यशोदा’ या नावाचा अनुबोधपट १६-२-२०१४ रोजी निघाला.
संदर्भ
- ^ a b "सिंधुताई सपकाळसह ७१ जणांना समाजभूषण पुरस्कार प्रदान". Divya Marathi.
- ^ Chavan, Vishwas (2012-06-15). Vishwasutras: Universal Principles for Living: Inspired by Real-Life Experiences (इंग्रजी भाषेत). AuthorHouse. ISBN 9781468581638.
- ^ "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन, वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". Loksatta. 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Sindhutai Sapkal Birthday: From begging to becoming the mother of thousands of orphans". Mumbai Mirror (इंग्रजी भाषेत). 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ Marathi, TV9 (2022-01-04). "Sindhutai Sapkal Death | दिवंगत सिंधूताईंच्या कार्याचा आढावा घेणारे फोटो आणि आता फक्त सोबत उरलेल्या आठवणी". TV9 Marathi. 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ a b "ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन, वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास". Loksatta. 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ "Sindhutai Sapkal Passed Away: मशहूर सामाजिक कार्यकर्ता पद्मश्री सिंधुताई सपकाल का 74 साल की आयु में निधन". Amar Ujala (हिंदी भाषेत). 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ Team, Editorial (2022-01-06). "Sindhu Tai Sapkal Biography – The Mother Teresa of Maharashtra, work, age, awards". DMER Haryana: Recruitment, News, Admit card, result (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.[permanent dead link]
- ^ a b c "Mamata Bal Sadan Saswad, Pune | Sindhutail Sapkal". www.sindhutaisapakal.org (इंग्रजी भाषेत). 2018-07-11 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2018-07-11 रोजी पाहिले.
- ^ a b शेजवलकर, प्र. चिं. (२०१३). यशोगाथा. पुणे: यशवंत पब्लिशिंग हाऊस. pp. ४९-५०. ISBN 978-81-926412-2-5.
- ^ "सिंधूताईंची संस्था आता सातासमुद्रापार! ( २८. १२. २०१७)".[permanent dead link]
- ^ "Sindhutai Sapkal Passes Away: अनाथांच्या माय सिंधुताई सपकाळ यांचं पुण्यात निधन". दैनिक सकाळ. 2022-01-05 रोजी पाहिले.
- ^ Jan 5, TNN / Updated:; 2022; Ist, 05:35. "Maharashtra: As Mai, Sindhutai spent all her life giving orphans food, a roof & hope | Pune News - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 2022-01-06 रोजी पाहिले.CS1 maint: extra punctuation (link) CS1 maint: numeric names: authors list (link)
- ^ "Padma Awards | Interactive Dashboard". www.dashboard-padmaawards.gov.in (इंग्रजी भाषेत). 2021-01-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-01-26 रोजी पाहिले.
- ^ "मानाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा; सिंधूताई सपकाळ यांना पद्मश्री जाहीर". Loksatta. 2021-01-25. 2021-01-26 रोजी पाहिले.
- ^ "माजी न्या. नरेंद्र चपळगावकरयांना भोसले स्मृती सन्मान".[permanent dead link]
- ^ "सिंधुताईंना डॉ. राममनोहर त्रिपाठी सन्मान पुरस्कार ( ९. ११. २०१७)". 2018-07-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
- ^ "padma awards : पद्म पुरस्कारांची घोषणा; महाराष्ट्रातील ६ जणांचा गौरव, सिंधुताई सपकाळ आणि गिरीश प्रभुणेंचा समावेश". Maharashtra Times. 2021-01-30 रोजी पाहिले.
- ^ "गोरा रंग, घाऱ्या डोळ्यांमुळे तेजस्विनी 'सिंधूताई'साठी झाली होती रिजेक्ट, नंतर असा मिळाला रोल".