साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील मातंग समाजातील कलावंत, साहित्यिक व समाजसेवक यांना पुरस्कार देण्यात येतो. ही योजना दि. १९ जुलै १९९७ पासून कार्यान्वित आहे.
निकष व अटी
संपादनमहाराष्ट्र शासनाने हा पुरस्कार प्रदान करण्यासाठी खालील निकष व अटी ठरवलेल्या आहेत.[१]
- व्यक्तींसाठीचे निकष
- सामाजिक क्षेत्रातील कार्याचा १० वर्षाचा अनुभव.
- पुरस्कार फक्त मातंग समाजातील व्यक्तीकरिता असेल.
- संस्था
- मांतग समाजाच्या कल्याणासाठी १० वर्षाहून अधिक काळ मौलिक कार्य केलेले असावे.
शिफारश पद्धती
संपादनया पुरस्कारासाठी शिफारश पद्धती खालीलप्रमाणे आहे.[१]
- व्यक्तीचे संपूर्ण जीवन चरित्र
- विना दुराचार प्रमाणपत्र
- गैरवर्तनाबाबत खटला किंवा शिक्षा झाली नसल्याचे प्रमाणपत्र
- सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्याचे प्रमाणपत्र
- संस्था व व्यक्ती यांनी केलेल्या विशेष कार्याचा तपशिल
लाभाचे स्वरूप
संपादन२५ व्यक्ती व ६ संस्था यांना पुरस्कार प्रदान करण्यात येतो. संस्थांना प्रत्येकी ५०,००० रुपये, शाल व श्रीफळ तर प्रत्येक व्यक्तीस २५,००० रुपये, शाल व श्रीफळ, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र, खण व सपन्तिक गौरव. एक वर्षासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ बस मार्फत एस टी बस प्रवास सवलत.
हे ही पहा
संपादनबाह्य दुवे
संपादनसंदर्भ
संपादन- ^ a b "सामाजिक न्याय विभागाअंतर्गत देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार. | Social Justice & Special Assistance Department". sjsa.maharashtra.gov.in (इंग्रजी भाषेत). 2018-05-18 रोजी पाहिले.