सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक

(सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक या पानावरून पुनर्निर्देशित)

सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हे महात्मा जोतिराव फुले यांनी लिहिलेले मराठी पुस्तक आहे. फुल्यांनी आपल्या हयातीत लिहिलेले हे अखेरचे पुस्तक आहे. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र यशवंत फुले यांनी इ.स. १८९१ साली हे पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक फुल्यांच्या धर्मविषयक मतांचे सार मानले जाते.

विकिस्रोत
विकिस्रोत
सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक हा शब्द/शब्दसमूह
विकिस्रोत, या ऑनलाईन मुक्त मराठी ग्रंथालयात पाहा.
सार्वजनिक सत्य धर्मपुस्तक : पहिल्या आवृत्तीचे मुखपृष्ठ

आयुष्याच्या अंतिम टप्प्यामध्ये फुल्यांना पक्षाघाताची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांनी हे पुस्तक आपल्या डाव्या हाताने लिहून पूर्ण केले[१]. याची रचना संवादात्मक असून धर्म, पाप, पुण्य इत्यादी विषयांवर विविध व्यक्तींनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी यात उत्तरे दिली आहेत.

अधिक वाचन संपादन

संदर्भ आणि नोंदी संपादन

  1. ^ फुले, यशवंत; पहिल्या आवृत्तीची प्रस्तावना; लिहिण्याचे मुख्य साधन जो उजवा हस्त तोच पक्षाघाताने निरोद्योगी झाल्यामुळे त्यास थोडे दुःख झाले. तथापि ईश्वरेच्छा म्हणून धैर्य न सोडता आपल्या डाव्या हस्ताने व अत्यंत विचाराने "सार्वजनिक सत्य धर्म" नावाचे पुस्तक तयार केले