सायमन कुझनेट्स

अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि सांख्यिकीशास्त्रज्ञ (१९०१-१९८४)

सायमन कुझनेट्स (इ.स. १९०१- इ.स. १९८५) हे एक अमेरिकन अर्थतज्ञ होते. त्यांना १९७१ चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले.

सायमन कुझनेट्स (1971)

१९५३ साली प्रकाशित झालेल्या शेयर्स ऑफ अपर इन्कम ग्रुप्स इन इन्कम अँड सेव्हिंग्स (उच्चवर्गाचा आर्थिक उत्पन्नात व संपत्तीत वाटा) या त्यांच्या शोधनिबंधाकरिता व १९५५ साली त्यांनी डेट्रॉइट शहरात त्यांनी दिलेल्या “इकॉनॉमिक ग्रोथ अँड इन्कम इनइक्वालिटी” (“आर्थिक वाढ व आर्थिक उत्पन्नातील विषमता”) या त्यांच्या व्याख्यानाकरीता कुझनेट्स विशेष प्रसिद्ध आहेत. यात त्यांनी खासगी भांडवलदारी व्यवस्थेत केवळ सुरुवातीस सामाजिक विषमता वाढते व काही वेळाने संपत्तीच्या देवाणघेवाणीतून साहजिकच अार्थिक समता अस्तित्वात येते असा विचार मांडला. तत्पुर्वीच्या कार्ल मार्क्स सारख्या अर्थतज्ञांच्या विचारांच्या विरुद्ध हा विचार होता. (मार्क्सच्या मते खासगी भांडवलदारी व्यवस्थेत सामाजिक संपत्ती काही थोड्या व्यक्तींच्या हातात—म्हणजेच खासगी भांडवलदारांच्या हातात—येऊन विषमता वाढत जाते व शेवटी भांडवलदारी व्यवस्था संपुष्टात येते.) कुझनेट्स यांच्या सिद्धांताचा विशेष हा की तो पहिल्यांदाच सामाजिक व वैयक्तिक संपत्तीच्या आकडेवारीवर आधारीत होता तर मार्क्सच्या काळात ही आकडेवारी उपलब्ध नव्हती. (तोमा पिकेती यांच्यामते असे असले तरी कुझनेट्स यांचा सिद्धांत चुकीचा होता.) कुझनेट्स सिद्धांतातील विषमतेच्या वाढीस व घटीस कुझनेट्सची वक्ररेषा ही संज्ञा आहे.

सुब्रमण्यम स्वामी हे भारतीय राजकारणी सायमन कुझनेट्स यांचे विद्यार्थी आहेत.