सायबेरियन वाघ

(सायबेरीयन वाघ या पानावरून पुनर्निर्देशित)

सायबेरियन वाघ (Panthera tigris altaica) ही प्रजाती पूर्व रशियात आढळून येते. याला अमूर, मंचुरियन, कोरियन वाघ, अथवा उत्तर चिनी वाघ असेही म्हणतात. पूर्वी मोठ्या भूभागावर वास्तव्य असलेल्या ह्या वाघाचे आज अमूर ऊशुरी या आग्नेय सायबेरियातील प्रांतातच वास्तव्य मर्यादीत राहिले आहे. रशियन सरकारने याच्या संरक्षणाचे मोठे प्रयत्न चालू केले आहेत. सध्या यांची संख्या ४५० ते ५०० आहे व केवळ एकाच मोठ्या जंगलात आहे त्यामुळे अमुरला सर्वाधिक वाघांच्या संख्येचा मान मिळाला आहे. सायबेरियन वाघ आकाराने वाघांमध्ये सर्वात मोठा असतो. त्याची फ़र ही खूप जाड असते व रंगाने थोडा हलका असतो.

सायबेरीयन वाघ

रशियातील सायबेरियन वाघाचे १९४० मध्ये केवळ ४० इतकीच संख्या शिल्लक राहिल्याने तत्कालिन सोविएत संघाने संरक्षण उपाय योजनांची कडक अंमलबजावणीमुळे तेथील वाघांची संख्या वाढण्यास मदत झाली. १९९० नंतर सोविएत संघाच्या विघटनानंतर बराच काळ खालवत्या आर्थिक परिस्थिती तसेच कायदे व सुव्यवस्थेच्या त्रुटींमुळे चोरट्या शिकारींचे प्रमाण वाढले होते. परंतु पुन्हा काही वर्षात सरकारच्या प्रयत्नांमुळे यावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. रशियन शास्त्रज्ञांपुढे सर्वात मोठा आहे तो म्हणजे सायबेरियातील इतर भागात या पसरवण्यास वाव देणे. सायबेरियन वाघांचे स्वामित्व क्षेत्रफळपण मोठे असते त्यामुळे अंतर्गत भांडणांमुळे वाघांच्या संख्येत वाढ होण्यास नैसर्गिक अडथळे येतात. सध्या वन्य सायबेरियन वाघांची ४०० ते ५०० संख्या असल्याचा अंदाज आहे.

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: