ख्रिच्शन फेड्रिक सामुएल हानेमान (इ.स. १७५५-इ.स. १८४३) हे एक जर्मन वैद्यक होते त्यांनी होमिओपॅथी या वैद्यकीयशास्त्राचा शोध लावला. १७८४ मद्धे तरुण वयातच त्यांना ड्रेसडेन येथे सर्जन जनरल चि जागा मिळाली, त्यांनी त्यावेळी जुनाट व्रणरोगावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला व हाडांच्या व्रणावर एक नवीन औषधी प्रक्रिया बसवली. सन १७९२ च्या आधी त्यांनी फ्रेंच, इंग्लिश व इटालीअन भाषांतून निरनिराळ्या १८ वैद्यक ग्रंथाचे भाषांतर केले, १७८४ मद्धे त्यांनी जुन्या आजारावर एक अपूर्व ग्रंथ लिहिला, या ग्रंथात त्यांनी असाध्य समजल्या जाणारया जुन्या रोगांवर जलोपचार व मसाजने मालिश करून रोगाचे हरण करण्याची पद्धतीबाबत माहिती दिली आहे. होमिओपॅथीचा शोध लावण्यापूर्वी सामुएल हानेमान याने केलेल्या प्रयोगांत त्याला बार्क ऑफ चायना म्हणजे सिंकोना नावाच्या वनस्पतीचा रस प्यायल्यावर स्वतःमध्येमलेरियाची लक्षणे दिसून आली होती. परंतु सिंकोना हे औषध मलेरिया रोग बरा करण्यासाठी वापरत असत. रसामध्ये घातलेले पाणी औषधाचे गुणधर्म स्मरणात ठेवून त्याप्रमाणे रुग्णास गुण देत असले पाहिजे असा हानेमानाने तर्क केला.

सामुएल हानेमान
जन्म हानेमान सामुएल ख्रिच्शन फेड्रिक
१० एप्रिल इ.स. १७५५
मैसन, जर्मनी
मृत्यू २ जुलै इ.स. १८४३
पॅरिस, फ्रांस
चिरविश्रांतिस्थान पॅरिस, फ्रांस
राष्ट्रीयत्व जर्मनी
नागरिकत्व जर्मन
शिक्षण एम्.डी.
पेशा वैद्यकीय
कारकिर्दीचा काळ इ.स. १७७१ ते इ.स. १८४३
धर्म ख्रिच्शन
जोडीदार जोहाना

सामुएल हानेमान यांना रसायनशास्त्राचे उत्तम ज्ञान होते. त्यांनी या विषयावर पुष्कळ लेख लिहिले आहेत. त्यांनी १७९३ व १७९९ च्या दरम्यान औषधी शास्त्रविषयकबरेच नवे ग्रंथ लिहिले. तेव्हापासून त्यास वैद्यकशास्त्रात प्रमाणभूत मानू लागले. १८१० साली ते लैप्झीक शहरी आले आणि होमिओपथिक औषधांचाच व्यवसाय करु लागले. १८१२ साली त्यांना लैप्झीक युनिव्हर्सिटीच्या वैद्यक शास्त्रावरील प्रोफेसरची जागा मिळाली आणि त्यांचा व्यवसाय फार जोमाने वाढू लागला. हे पाहून त्यांचा उत्कर्ष सहन न झाल्यामुळे तेथील सर्व ॲलोपॅथिक लोक व केमिस्ट लोक एकवटले आणि त्यांनी सामुएल हानेमान यांच्यावर १८२० मध्ये एक खटला केला. जर्मनीत त्या वेळी असा कायदा होता की, डॉक्टर लोकांनी डिस्पेन्स (औषध तयार करावे. हानेमान साहेब एम.डी. पास झालेले डॉक्टर असल्यामुळे त्यांनी औषध तयार करणे हे त्यावेळच्या कायद्याच्या विरुद्ध होते म्हणून त्यांच्यावर खटला दाखल करण्यात आला व त्यांना औषध तयार करणे व देणे यावर बांधी घालण्यात आली. यानंतर सामुएल हानेमान यांनी लैप्झीक सोडले आणि ऑस्ट्रिया येथील अनाल्ट कोएथन येथे गेले.तेठीक ड्यूक फर्डिनंड यांनी त्यांना त्यांच्या राज्यात होमिओपथिक औषधे तयार करण्याचा अधिकार दिला व पुढे त्यांच्या औषधांनी रोग्यास उत्तम गुण आल्याचे पाहुन १८२२ मद्धे त्यास राज्यमंत्री ही पदवी दिली.

लेखन संपादन

  • ऑरगॅऑन ऑफ मेडिसीन
  • मटेरिया मेडीका प्युरा
  • क्रॉनिक डिसीजेस
  • लेसर रायटिंग्ज ऑफ सामुएल हानेमान