सामनावीर पुरस्कार (क्रिकेट)
क्रिकेटच्या खेळात, सामनावीर म्हणजेच मॅन ऑफ द मॅच किंवा प्लेयर ऑफ द मॅच हा पुरस्कार सामन्यात सर्वाधिक प्रभावी कामगिरी करणाऱ्या खेळाडूला दिला जातो. हा शब्द इतर खेळांनी स्वीकारण्यापूर्वी मूळतः क्रिकेटमध्ये वापरला गेला होता. हा पुरस्कार सामान्यत: विजेत्या संघातील खेळाडूला दिला जातो, परंतु जर एखादा संघ हरला असेल परंतु पराभूत संघातील खेळाडूने अविश्वसनीय कामगिरी केली असेल तर त्याला सामनावीर म्हणूनही नाव दिले जाऊ शकते.
कसोटी क्रिकेटमध्ये, सामनावीर पुरस्कार हा १९८० च्या दशकाच्या मध्यात नियमितपणे देण्यास सुरुवात झाली.[१] हा सहसा त्या खेळाडूला दिला जातो ज्याचे योगदान सामना जिंकण्यासाठी सर्वात महत्वाचे मानले जाते, परंतु पराभूत संघातील खेळाडूने पुरस्कार प्राप्त केल्याची अनेक उदाहरणे आहेत.[२]
कसोटी सामन्यांमध्ये, जॅक कॅलिसच्या नावावर १६६ सामन्यांमध्ये सर्वाधिक २३ पुरस्कारांचा विक्रम आहे, त्यानंतर मुथय्या मुरलीधरनच्या नावावर १९ पुरस्कार आहेत.[१]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर ४६३ सामन्यांमध्ये सर्वाधिक ६२ सामनावीर पुरस्काराचा विक्रम आहे.[३] सनथ जयसूर्या ४८ पुरस्कारांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांमध्ये, झिम्बाब्वेचा सिकंदर रझा १७ सामनावीर पुरस्कारांसह आघाडीवर आहे.[४]
ऑस्ट्रियाच्या अँड्रिया-मे झेपेडा हिने सप्टेंबर २०२१ मध्ये बेल्जियम विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेत]सर्वच्या सर्व सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार पटकावण्याची किमया केली. अशाच कामगिरीची पुनरावृत्ती हेली मॅथ्यूजने ऑक्टोबर २०२३ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज ह्या मालिकेमध्ये केली. परंतु वेस्ट इंडीजला तरीही मालिका २-१ ने गमवावी लागली.
संदर्भयादी
संपादन- ^ a b "नोंदी / कसोटी सामने / वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच) /सर्वाधिक सामनावीर पुरस्कार". ईएसपीएन क्रिकइन्फो. एसपीएन स्पोर्ट्स मीडिया. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "मॅन-ऑफ-द-मॅच मोनोपॉली". क्रिकइन्फो. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय एकदिवसीय / वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच) /सर्वाधिक सामनावीर पुरस्कार". =ईएसपीएन क्रिकइन्फो. एसपीएन स्पोर्ट्स मीडिया. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.
- ^ "नोंदी / आंतरराष्ट्रीय टी२० / वैयक्तिक नोंदी (कर्णधार, खेळाडू, पंच) /सर्वाधिक सामनावीर पुरस्कार". =ईएसपीएन क्रिकइन्फो. एसपीएन स्पोर्ट्स मीडिया. २९ ऑक्टोबर २०२४ रोजी पाहिले.