गोपाळ गोविंद मुजुमदार

(साधुदास या पानावरून पुनर्निर्देशित)

साधुदास (जन्म : सांगली, इ.स. १८८३; - ६ एप्रिल १९४८) (पूर्ण नाव गोपाळ गोविंद मुजुमदार-पाटणकर) हे एक मराठी कवी आणि कादंबरीकार होते.

साधुदास यांचे प्राथमिक शिक्षण सांगलीत आणि पुढचे फर्ग्युसन महाविद्यालयात. कॉलेजशिक्षण अर्धवट टाकून ते सांगलीला गेले आणि नोकरी करू लागले.

साधुदास या नावाने त्यांनी काव्यरचना आणि अन्य लिखाण केले आहे. रामकथा चार भागांत सांगण्याच्या उद्देशाने त्यांनी ’विहारे’ नावाची काव्यरचना केली. पण ते फक्त तीनच विहार पूर्ण करू शकले.

साधुदास यांच्या ’पौर्णिमा’ या कादंबरीत शनिवारवाड्याचे यथातथ्य वर्णन आले आहे.

साधुदास यांनी लिहिलेली पुस्तके

संपादन
  • काव्ये
    • गृहविहार (काव्य)
    • रणविहार (काव्य)
    • वनविहार (काव्य)
  • स्तोत्रे:-
    • कृष्णालहरी
    • भीमशती
    • रामशती
    • सद्गुरूशती
    • सीताशती
  • स्फुटकाव्ये :-
    • निर्माल्यसंग्रह भाग १, २.
    • महायुद्घाचा पोवाडा
  • कादंबऱ्या :-
    • पौर्णिमा-पूर्वरात्र
    • पौर्णिमा-उत्तररात्र
    • मराठेशाहीचा वद्यपक्ष : प्रतिपदा-पूर्वरात्र व उत्तररात्र
    • मराठेशाहीचा वद्यपक्ष : द्वितीया पूर्वरात्र व उत्तररात्र
  • अन्य पुस्तके :-
    • मराठीची सजावट : भाग १, २
    • बुद्घिबळाचा मार्गदर्शक

मराठीच्या पाठ्यपुस्तकात असलेल्या साधुदास-रचित मुलांच्या दोन आवडत्या कविता

संपादन

नाकेला अन्‌ गुलजार । सावळानी सुंदर भासे
कसल्याशा करूनी बेतां । मधुमधून मोहक हासे
इवल्याशा त्याच्या देहीं । सरदारी ऐट विलासे
डोळ्यांत चमक पाण्याची
न्यारीच नजर दाण्याची
छाती न पुढे जाण्याची
दुष्टांचा कर्दनकाळ
नाकेला अन्‌ गुलजार !

पडूं आजाऽरी
मौज हीच वाटे भारी
मिळेल सांजा साबूदाणा
खडीसाखर मनुका बेदाणा
संत्री साखर लिंबू आणा
जा बाजाऽरी
मौज हीच वाटे भारी


पहा : टोपणनावानुसार मराठी कवी; टोपणनावानुसार मराठी लेखक