साधना विद्यालय (हडपसर)

साधना विद्यालय ( शुद्ध मुलांचे )हडपसर, पुणे - २८ हे रयत शिक्षण संस्था, सातारा या शैक्षणिक संस्थेची एक शाखा आहे. रयत शिक्षण संस्थेची स्थापना पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांनी १९१९ साली स्थापन केली आहे. रयत शिक्षण संस्था ही जगातील सर्वात मोठी खाजगी शैक्षणिक संस्था आहे.

साधना विद्यालय हडपसर, पुणे - २८ या शाळेची स्थापना ११ जून १९५४ रोजी झाली. या विद्यालयात इयत्ता ५वी ते १२वी पर्यतचे ६००० पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यालयाचा परिसर साधना शैक्षणिक संकुल म्हणून परिचित आहे. या संकुलामध्ये मराठीइंग्रजी माध्यमाच्या पूर्वप्राथमिक ते पदव्युत्तर शिक्षणाची ( केजी टू पीजी) सोय उपलब्ध असून संपूर्ण संकुलात अंदाजे २५००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. साधना विद्यालय (मुलांचे) ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी शाळा आहे.