सातवा चामराज वोडेयार

सातवा चामराजा वोडेयार सातवा (१७०४१७३४) हा मैसुरुचा १७वा राजा होता. हा दोड्डा कृष्णराजाचा दत्तक मुलगा होता. हा १७३२-३४ अशी दोन वर्षे नावापुरता सत्तेवर होता. त्याच्या राजवटीत राज्याचे सेनापती आणि दीवाण यांनीच राज्याचा कारभार चालवला.

सातवा चामराज वडियार
मैसुरुचा १७वा राजा
अधिकारकाळ १९ मार्च, १७३२ - १० जून, १७३४
अधिकारारोहण १९ मार्च, १७३२
राज्याभिषेक १९ मार्च, १७३२
राजधानी मैसुरु
जन्म १७०४
मृत्यू १७३४
पूर्वाधिकारी दोड्डा कृष्णराज
भाऊ दुसरा कृष्णराज वडियार
उत्तराधिकारी दुसरा कृष्णराज वडियार
वडील देवराज अर्स
राजघराणे वडियार घराणे
धर्म हिंदू

दत्तकविधान आणि राज्याभिषेक

संपादन

सातवा कृष्णराज अंकनहळ्ळीच्या देवराज अर्सचा मुलगा होता. याला आणि त्याला महाराणी आणि महाराजा दोड्डा कृष्णराजा वोडेयार आण त्याची पत्नी देवजम्मा यांनी दत्तक घेतले होते.

हा वयाच्या ३०व्या वर्षी १९ मार्च, १७३२ रोजी सिंहासनावर बसला. यामागे सेनापती देवराज आणि दीवाण नंजराज होते. दोनच वर्षांनी, १० जून, १७३४ रोजी राज्याच्या कारभाऱ्यांना विरोध केल्याबद्दल त्याला पदच्युत केले गेले आणि त्याच्या पत्नीसह त्याला तुरुंगात टाकण्यात आले. काही महिन्यांतच कबलादुर्ग येथील तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.

त्याच्यानंतर त्याचा भाऊ दुसरा कृष्णराज वडियार राजा झाला.