सातभाई (शास्त्रीय नाव:टरडॉइड्स माल्कोमी) हा एक पक्षी आहे. याला इंग्लिशमध्ये लार्ज ग्रे बॅबलर असे नाव आहे.

सातभाई
Large Grey Babbler (Turdoides malcolmi) at canopy at Hodal I IMG 5874.jpg
शास्त्रीय नाव Turdoides malcolmi
कुळ Timaliidae
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश लार्ज ग्रे बॅबलर
संस्कृत हहोलिका
हिंदी गैगई, घुघोई

या पक्षाचे कपाळ राखाडी रंगाचे आणि संपूर्ण शरीर तपकिरी रंगाचे असते.हा पक्षी उडत असताना फुलवलेल्या शेपटीची बाहेरची पिसे पांढरट दिसतात,त्याची शेपूट लांब सडक असून शेपटीची मधली पिसे सर्वात लांब आणि कडेची पिसे लहान असतात.सातभाई नेहमी सातच्या संख्येत दिसतातअसा समज आहे.मात्र ८-१० पक्षांपासून २०-२२ पक्षांपर्यंत ही थवे दिसून येतात.हे पक्षी छोट्यामोठ्या थव्यांमध्ये विखुरलेले असतात. जमिनीवरचे किडे,वाळव्या ,अळ्या,आणि गवताच्या बिया हा त्यांचा मुख्य आहार असतो. थव्यातला एक पक्षी जवळच्या झाडाच्या शेंड्यावर बसून टेहाळनीचे काम करतो. एखादा शिकारी पक्षी दिसला की विशिष्ट आवाज काढून जमिनीवर खाद्य शोधात असणाऱ्या पक्षांना सावध करतो. धोक्याचा इशारा मिळताच जमिनीवरचे सर्व पक्षी ताबडतोब जवळच्या एखाद्या झाडावर किवा झुडपात दडून बसतात. झाडावर बसून टेहळणी करण्याचे काम थव्यातले पक्षी आलटून पालटून करतात.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.