साउथ पार्क
साउथ पार्क हे अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील एक भाग आहे. मॉस्किटो आणि पार्क पर्वतरांगांच्या मधील हा साधारण सपाट प्रदेश ३,२०० मी (१०,००० फूट) उंचीवर असून याचा विस्तार अंदाजे २,६०० किमी२ आहे. याच सारखे उंचीवरील इतर दोन प्रदेश नॉर्थ पार्क आणि मिडल पार्क नावाने ओळखले जातात.
हा लेख कॉलोराडोमधील साउथ पार्क प्रदेश याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, साउथ पार्क (निःसंदिग्धीकरण).
डेन्व्हरच्या आग्नेयेस अंदाजे १०० किमी अंतरावर असलेल्या साउथ पार्क प्रदेशातून साउथ प्लॅट नदीचा उगम होतो. फेरप्ले हे येथील सगळ्यात मोठे गाव असून त्याची लोकसंख्या ६७९ आहे.