सहाना देवी ( बांग्ला: সাহানা দেবী ) (जन्म १७.०५.१८९७ - मृत्यु ०६.०४. १९९०) [१] या भारतीय गायिका होत्या. त्या रवींद्र संगीताचे [२] गायन करत असत.

कुटुंबीय संपादन

त्यांचा जन्म एका प्रतिष्ठित बंगाली ब्राह्मो कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील डॉ. प्यारे मोहन गुप्ता हे जिल्हा सिव्हिल सर्जन होते. त्यांचे आजोबा काली नारायण गुप्ता हे एक जमीनदार होते. ते ब्राह्मो समाजाचे नेते, समाजसुधारक आणि गीतकार होते. सर, के.जी. गुप्ता, अव्वल दर्जाचे भारतीय आय.सी.एस. अधिकारी हे त्यांच्या वडिलांचे मोठे बंधू होते. देशबंधू चित्तरंजन दास हे त्यांचे मामा होते. [३]

शिक्षण आणि कारकीर्द संपादन

सहाना यांनी संगीताचे धडे त्यांच्या मावशीकडून म्हणजे अमला दास यांच्याकडून घेतले. अमला दास या रवींद्र संगीताच्या आद्य पुरस्कर्त्या होत्या. आणि एच.एम.व्ही.मध्ये गाणी रेकॉर्ड करणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला होत्या. रवींद्रनाथ टागोर आणि दिनेंद्रनाथ टागोर यांच्याकडून थेट शिकणाऱ्या काही गायकांपैकी त्या होत्या. त्यांना बंगालची गानकोकिला हा बहुमान प्राप्त झाला होता. [४]

१९२७ मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या शांतिनिकेतनमध्ये सहाना देवींना आश्रय दिला होता परंतु कालांतराने त्यांना ते ठिकाण सोडावे लागले. रवींद्रनाथ टागोरांनी त्यांची गाणी सुधारण्याची परवानगी दिलेल्या दोन गायकांपैकी सहाना देवी एक होत्या. [५]

सहकारी संपादन

१९२२ मध्ये, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या गया अधिवेशनात त्या दिलीपकुमार रॉय यांना प्रथम भेटल्या. आणि त्यांच्या संगीत शैलीने खूप प्रभावित झाल्या होत्या.

श्रीअरविंद आश्रमात प्रवेश संपादन

२२ नोव्हेंबर १९२८ मध्ये,[४] सहाना देवी पॉंडिचेरी येथील श्रीअरविंद आश्रमात दाखल झाल्या आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत म्हणजे १९९० पर्यंत तेथेच राहिल्या. [६] १९३० ते १९३८ या कालावधीमध्ये रोजच्या रोज त्यांना श्रीअरविंद यांच्याकडून पत्ररूपाने मार्गदर्शन मिळत असे. आश्रमात आल्यानंतर त्यांच्यामध्ये नृत्य आणि काव्य कौशल्यांचा विकास झाला. [४]

लेखन संपादन

त्यांनी केलेले लेखन पुस्तक रूपाने प्रकाशित झाले आहे. ही पुस्तके पुढीलप्रमाणे - [४]

०१) अॅट द फीट ऑफ द मदर अँड श्रीअरबिंदो (इंग्रजी)

०२) फोर्टी इयर्स अॅगो (इंग्रजी)

०३) सेव्हरल पोएम्स (इंग्रजी)

०४) देवी यांनी १९७८मध्ये 'स्मृतीर खेया' नावाचे आत्मचरित्र लिहिले [७] (सोबत दिलेल्या लिंकवर बंगाली भाषेतील हे पुस्तक उपलब्ध आहे.)

बाह्य दुवे संपादन

अल्प परिचय

संदर्भ संपादन

  1. ^ Sri Chinmoy. "Sahana Devi | Sri Chinmoy". 14 June 2011 रोजी पाहिले.
  2. ^ Sudhiranjan Mukhopadyay. "Hemanta - The Early Years". Archived from the original on 2012-07-16. 14 June 2011 रोजी पाहिले.
  3. ^ "Sahana Devi - Forty Years Ago". www.searchforlight.org/. 24 February 2012 रोजी पाहिले.
  4. ^ a b c d "auromaa.org".
  5. ^ Ashis K. Biswas (28 Jan 2002). "Copy Write, Unbound". Outlook India. 14 June 2011 रोजी पाहिले.
  6. ^ "Sahana Devi - Forty Years Ago". Sri Aurobindo Ashram Trust. 14 June 2011 रोजी पाहिले.
  7. ^ Alice Thorner; Maithreyi Krishnaraj (2000). Ideals, Images, and Real Lives: Women in Literature and History. Orient Blackswan. p. 66. ISBN 978-81-250-0843-9.