सरदार स्वरणसिंग

भारतीय राजकारणी
(सरदार स्वर्णसिंग या पानावरून पुनर्निर्देशित)

सरदार स्वरणसिंग (ऑगस्ट १९, इ.स. १९०७ - ऑक्टोबर ३०, इ.स. १९९४) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. ते इ.स. १९६४ ते इ.स. १९६६ तसेच इ.स. १९७० ते इ.स. १९७४ या काळात भारताचे परराष्ट्रमंत्री होते. इ.स. १९७१ मधील भारत-रशिया मैत्रीकरार घडवून आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. ते इ.स. १९५७, इ.स. १९६२, इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये पंजाब राज्यातील जालंधर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.