समवृत्त भाषांतर म्हणजे मूळ लेखन ज्या वृत्तात छंदोरचनेत आहे त्याच छंदोरचनेत केलेले भाषांतर. ही संज्ञा अर्थातच ज्या भाषांमध्ये छंदोरचनेच्या दृष्टीने समान परंपरा आहे अशा भाषांतील परस्परांत झालेल्या भाषांतरांबाबतच योजता येते. उदा. संस्कृत आणि मराठी ह्या भाषांच्या काव्यरचनेच्या परंपरांत अनेक अक्षरगणवृत्ते आणि मात्रावृत्ते ह्यांचा सारख्याच पद्धतीने वापर होताना आढळतो. मराठी काव्यरचनेच्या परंपरेत समवृत्त भाषांतर ही संज्ञा प्राधान्याने संस्कृत भाषेतून मराठीत भाषांतर होताना वापरण्यात आली असली तरी मराठीतून संस्कृतातही समवृत्त भाषांतरे करण्यात येत असल्याचे आढळते.[१]

संदर्भ संपादन

संदर्भसूची संपादन

  • दातार, सी. भा. श्रीगीतरामायणस्य समवृत्तः संस्कृतानुवादः. p. https://sanskritdocuments.org/sites/SanskritGeetaRamayanam/. १२ नोव्हेंबर २०२० रोजी पाहिले.