सदाभाऊ खोत
सदाभाऊ खोत (जन्म:१ जून, १९६४) हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील राजकारणी आहेत. ते रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष होते.[२] त्यांनी 2014 ची लोकसभा निवडणूक माढा (लोकसभा मतदारसंघ) येथून SWP/NDA उमेदवार म्हणून लढवली.[३] १० जून २०१६ रोजी ते महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्य जागेवरून विधानपरिषद सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले. ८ जुलै रोजी त्यांचा महाराष्ट्र सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून मंत्री परिषदेत समावेश करण्यात आला. त्यांच्याकडे कृषी, फलोत्पादन आणि पणन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली होती.
सदाभाऊ खोत | |
मतदारसंघ | माढा (लोकसभा मतदारसंघ) [१] |
---|---|
राजकीय पक्ष | रयत क्रांती संघटना |
संदर्भ
संपादन- ^ "Maharashtra Council polls: Narayan Rane among 10 candidates elected unopposed".
- ^ "सदाभाऊंची नवी संघटना : रयत क्रांती संघटना – News18 लोकमत". lokmat.news18. १ एप्रिल २०२३ रोजी पाहिले.
- ^ "Bitter battle in sight for bigwigs in sugar belt". द टाइम्स ऑफ इंडिया. 2016-05-12 रोजी पाहिले.