• जातीयवादी गावगुंडानी बौद्ध समाजाला गावातुन हाकलून दिले*
  • ऑट्रोसिटी दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ*
  • निलंगा: प्रतिनिधी*
  • सरकार भाजप शिवसेनेचे असो की काँग्रेस राष्ट्रवादीचे बौद्ध मातंग समाजावरील अन्याय अत्याचाराची मालिका काही बंद होत नाही.*
  *असाच एक प्रकार बौद्ध समाजातला गावातून हाकलून दिल्याचा नुकताच उघडकीस आला आहे.*
    *याबाबत अधिक माहिती अशी की, लातुर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकणी (थोर) या गावातील पूर्ण  बौद्ध समाजाला गावातील जातीवादी गावगुंडानी हाकलून बहिष्कृत केल्याचा प्रकार  उघडकीस आला आहे.*
     *लातुर जिल्ह्यचे पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या मतदार संघातील व निलंगा शहरापासून अगदी 12 कि मी अंतरावर असलेल्या माकणी (थोर) या गावात बौद्ध समाजाचे चार (04 ) घरे असुन ते मोलमजुरी करून आपल्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करत असतात .गावातील बौद्ध कुटुंब  हे स्वाभिमानाने  जगत असल्याने जातीय वाद्याच्या पोटात पोटशूळ उटल्याने ते नेहमी या ना त्या कारणावरून बौद्ध समाजातील प्रमुख अंगद बसप्पा गवळी यांना व इतरांना ई सन 2001 पासून त्रास देतात याबाबत ऑट्रोसिटी चा गुन्हा ही दाखल होता. याचाच राग मनात ठेऊन दि: 9 जुलै 2019 रोजी घरात कोणी नसल्याचे पाहून गावातील जातीयवादी गावगुंड यशवंत वामन सुर्यवंशी,वामन श्रीपती सुर्यवंशी, शांताबाई वामन सूर्यवंशी यांनी जातीय द्वेषातुन  बौद्ध वस्तीतील घरात प्रवेश करून अश्लील  भाषेत शिवीगाळ करून महाराचे धेडग्याचे 4 घरे फुकटचे खाऊन तुह्मी माजलात शेन काढून शेन  खायची तुमची औलाद आमच्या समोर इस्त्री चे कपडे घालून ताट मानेन फिरू लागलात.आता तुम्हाला तुमची आवकात दाखवल्या शिवाय गप्प बसणार नाही .म्हणून अपमानित केले ते एवढ्या वरच थांबले नाहीत तर त्यांनी महिलांना लाज वाटेल अश्या शब्दात बोलून महिलांनाही मारहाण केली. घडलेल्या प्रकारा बाबत अंगद गवळी व समाजातील लोकांनी औराद (शहा) ता निलंगा पोलिस ठाणे गाठले व सविस्तर हकीकत सांगून न्याय देण्याची मागणी केली असता .पोलिसानी कायदेशीर कारवाई न करता .थातूर मातूर अर्ज लिहून घेऊन आम्ही गावाकडे येतो तुम्ही म्हणून  बौद्ध लोकांना गावाकडे पाठवून दिले.*
      *बौद्ध लोक  गावाकडे गेले पोलिसांची वाट पाहिली परंतु पोलीस चार (4)दिवस गावाकडे फिरकले नाहीत.असे डी वाय एस पी ला दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.*
       *प्रकरण मिटले असे समजून नेहमी प्रमाणे दि.12 जुलै 2019  रोजी काही कामानिमित्त बौद्ध समाजातील महिला गावात गेल्या असता गावातील गावगुंडानी महिलाना चौकात अडवून अश्लील अर्वाच्य  भाषेत बोलून अपमानित केल.*
  *याबाबत महिलांनी प्रतिकार केला असता मराठा समजातील काही लोक एकत्रित आले.ते लोक एवढयावरच थांबले नाही त्यात  खालील लोकांनी यशवंत वामन सुर्यवंशी ,शांताबाई वामन सुर्यवंशी, वामन श्रीपती सुर्यवंशी ,परमेश्वर प्रकाश सुर्यवंशी ,तुकाराम पांडुरंग सुर्यवंशी ,हणमंत उर्फ पिंटू बाबुराव येळीकर ,दिगंबर माणिक सुर्यवंशी ,प्रकाश उर्फ पिंटू हरिश्चंद्र सुर्यवंशी ,विजयकुमार व्यकंट सुर्यवंशी ,ओमकार बालाजी सुर्यवंशी ,मेघराज युवराज सुर्यवंशी, चंद्रसेनन वामन येळीकर ,मोहन पुंडलिकराव आकडे ,नेताजी शिवाजी सुर्यवंशी ,उल्लास मगरध्वज सुर्यवंशी, पवन मधुकर सुर्यवंशी ,कृष्णा बालाजी सुर्यवंशी ,व्यकट नेताजी सुर्यवंशी ,व इतर 50 ते60  लोकांनी 14 जुलै  2019 रोजी सकाळी 9 ते 10 च्या सुमारास गावातील मंदिरात बैठक बोलाऊन  सर्वानुमताने बैठकीत निर्णय झाला. तो असा बौद्ध समाजाला गावात राहू द्यायचे नाही, बौद्ध लोकांना किराणा राशन पाणी द्यायचे  नाही बौद्ध लोकांना गावात व इतर ठिकाणी फिरू द्यायचे नाही इत्यादी जीवनावश्यक गोष्टी द्यायच्या नाहीत असे ठरले.*
*बैठक संपताच बैठकीतील सर्व लोक थेट बौद्ध वस्तीत घुसले व सर्वांनी तात्काळ आताच्या आता  घरे सोडून चालते व्हा अन्यथा बौद्ध वस्ती जाळून टाकण्याचा सज्जड दम दिल्यानं घाबरलेल्या बौद्ध समाजातील लोकांनी आपल्या लहान मुलं बाळासह वयोवृद्ध म्हाताऱ्या- कोताऱ्या सह थेट गाव सोडून तालुक्याचे ठिकाण गाठले आहे सद्या तालुक्यातील समाज बांधवांकडे आश्रय घेत आहेत.*
            *याबाबत पीडित गवळी बौद्ध समाजाने दिनांक 17 जुलै 2019 रोजी पोलीस ठाणे* *औराद(शहा) डी वाय एस पी निलंगा उपजिल्हाधिकारी निलंगा, तहसीलदार निलंगा यांच्याकडे तक्रार देऊन ही अद्याप कसलिच कायदेशीर कारवाई झाली नाही**
 *याबाबत समाज बांधवांनी आवाज उठवुन न्याय देण्याची मागणी पीडित अंगद बसाप्पा गवळी, तेजाबाई भीमराव ढाले, किरण अंगद गवळी ,विद्याबाई अंगद गवळी,आकाश अंगद गवळी, प्रभावती हंबिर गवळी,संतोष हंबिर गवळी,संतोषी संतोष गवळी,दीक्षा संतोष गवळी ,नागिन हंबिर गवळी, निलेश हंबिर गवळी ,सचिन शत्रुघ्न गवळी, हणमंत शत्रुघ्न गवळी,गीता हणमंत गवळी, लक्ष्मण भरत गवळी, वैशाली लक्ष्मण गवळी, दिव्या लक्ष्मण गवळी, प्रिती लक्ष्मण गवळी, अनिल भरत गवळी, वनश्री अनिल गवळी,अवधूत अनिल गवळी, गौतम लक्ष्मण* *गायकवाड़, नरसिंग रघुनाथ कांबळे, सुनीता नरसिंग  कांबळे,वैष्णवी नरसिंग कांबळे, वैभवी नरसिंग कांबळे, नरेंद्र नरसिंग कांबळे* 
  • यांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलताना केली*


  • युथ पँथर संघटना*
  • संस्थापक अध्यक्ष:- भाऊसाहेब कांबळे*
  • लातूर जिल्ह्यामध्ये उच्चवर्णियांकडून बौद्ध ,दलीत मातंग समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे प्रमाण अधिकाधीक वाढत चालले आहे...... कुठेही आळा बसताना दीसुन येत नाही..... सरकार व स्थानिक प्रशासनाने झोपेचे सोंग घेतलेले आहे...घर जाळून जिवीत हानी करण्यापासून ते दलीत समाजाच्या वस्त्या- वस्त्या उठवून पळवून लावन्याचे काम जातीवादी लोकाकडून केले जात असताना कुठलीही दखल घेतली जात नाही..... युथ पँथर समाजाचा बुलंद आवाज म्हणुन संवैधानीक मार्गाने पीडीतांना न्याय मिळवून देन्याचे कार्य प्रमाणीकपणे करत आहे. दलीत समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबले* *पाहीजे प्रस्थापीताकडून हे जातीचे राजकारण बंद झाले पाहीजे.....अन्यथा*
*संविधानीक मार्गाने जर न्याय मिळणार नसेल तर युथ पँथर मोर्चा आंदोलनामध्ये वेळ वाया घालवला जानार.....पँथर स्टाईल मधे जस्यास तसे उत्तर देईल जे काही पडसाद उमटतील त्याला सरकार, व स्थानिक प्रशासन जवाबदार असेल........*
  • अन्याय अत्याचार हा खपवून घेतला जाणार नाही..... बहूजन समाजाचा बुलंद आवाज म्हणुन युथ पँथर ची महाराष्ट्र भर ओळख आहे....तमाम जनतेच्या न्याय हक्कासाठी आमचा लढा हा अविरत चालूच असेल...*