नकल डकव संपादन

  असे दिसून येते की आपण गोदावरी आरती लेखात जोडलेली सामग्री कॉपीराइट धारकाच्या परवानगीशिवाय इतर स्त्रोतांमध्ये नकल (कॉपी) केली आहे. या कारणासाठी, तो काढण्यात आला आहे. कायदेशीर कारणांसाठी, विकिपीडिया प्रताधिकार (कॉपीराइट) केलेल्या मजकुरास, किंवा इतर संकेतस्थळावरून घेतलेले छायाचित्र किंवा मुद्रित सामग्री/मजकूर विनापरवानगीने स्वीकारू शकत नाही; अशा जोडण्या हटविल्या जातील. आपण बाह्य संकेतस्थळे (वेबसाइट्स) किंवा प्रकाशनांचा स्त्रोत याला माहितीचा एक स्रोत म्हणून वापरू शकता परंतु वाक्ये किंवा प्रतिमा/चित्र यासारख्या सामग्रीचा स्त्रोत म्हणून नव्हे - आपल्या स्वतःच्या शब्दांचा वापर करून आपण लिहिणे आवश्यक आहे. विकिपीडियावर प्रताधिकाराचे उल्लंघन फार गंभीरपणे घेतले जाते आणि अशा प्रकारचे सततचे उल्लंघन करणाऱ्या सदस्यांना प्रतिबंधित केले जाईल.


आपण केलेल्या मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद. प्रथमदर्शनी आपण वगळलेली माहिती संकेतस्थळावर सार्वजनिक असल्याचे वाटते परंतु तरीहि आपण केलेल्या सूचनेनुसार प्रकाशकाकडून योग्य ती परवानगी घेऊन सुधारणा करतो किंवा स्वतःच्या शब्दांत लिहिण्याचा प्रयत्न करतो.