आ. पप्पा , आज तुमचा वाढदिवस . आमच्या साठी अत्यंत आनंदाचा दिवस..

तुमच्या मित्रांकडून कायम तुम्ही केलेला संघर्ष ऐकायला मिळतो.

ज्या वयात मुलं शाळेत जातात त्या वयात तुम्ही नोकरी साठी संगमनेर ला आले अन शिवदास मंगनिराम झंवर यांच्या कडे नोकरी स्वीकारली.

कै. बाबूशेठ झंवर , म्हणजे तुमचे देव , त्यांच्या आणि व्ही. जी काका देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच कधी बिरजलाल मामांच्या तर कधी रामबीलासजी मालपाणी यांच्या साथीने तुम्ही कपड्यांची खरेदी करायला जात.

तुमच्या प्रामाणिकपणामुळेच आजही सर्व जुने व्यापारी तुम्हाला शिवदास मंगनिराम झंवर म्हणूनच ओळखतात.

कधीही स्वतः चा विचार तुम्ही केला नाही . घर अन दुकान इतकंच मनात ठेवून मम्मी च्या साथीने राजुला, शिल्पा ला अन मला मोठ केलंत.

मला आज ही आठवतं , ते आपलं छोटयाशा घरात राहणं , ते दिवाळी आली की आमच तुमच्या बरोबर तासनतास दुकानात थांबणं , तो दिवाळीचा पसारा ,किती ही थकून आले तरी ते रंगकाम करणं... ते तुम्ही आणलेले इस्टिम चे शर्ट घालून मिरवण ... ती शिल्पाच्या अन माझ्या शिक्षणासाठी तुम्ही केलेली धडपड , सगळं सगळं चित्र आठवतय...

शेजारी पाजारी गल्ली सगळी तुम्हाला मानाने शामभाऊ म्हणून बोलावते.

शेजारच्या प्रतिभाताई , शोभाताई रंजन ताई आजही प्रेमाने शामभाऊ ची विचारपूस करतात .विजयाबाई सिकची ज्योतिबाई आजही तुम्हाला सख्या भावाप्रमाणे जीव लावतात. ते नंदन तृप्ती चे लाडके बाबा , विवान चे लाडके साखर दादा , किती तरी रूपानं तुम्हाला पाहतो..

पप्पा तुम्ही जर आम्हा भावंडाना शिकवलं नसतं तर आम्ही आयुष्यात काहीच करू शकलो नसतो हे मात्र खरं..

कारण एक नोकरदार , मिडल क्लास , कमी सॅलरी असलेला प्रामाणिक माणूस खूप कष्टाने पुढे येतो हे तुम्हाला पाहून कळते...

आज आम्ही पोरं जे काही आहोत फक्त तुमच्या मुळे आणि तुमच्यामुळे... तुमच्यातल्याच साधे पणाने तुम्ही लोकांना आपलंसं केलंत..

अगदी कुठलीही अपेक्षा न करता सहज शिवदास मंगनिराम यांची नोकरी सोडलीत...

कुणाला ही न दुखावता फक्त आपण आपलं काम करत राहावं हे तुमच्या कडून शिकावं...

तुमचं सगळ्या भावांवर असलेलं प्रेम अगदी भारीच.. मनानं आज देखील अत्यंत हळवे , कधी ही कुणाला सहज मनात असलेलं न बोलून दाखवणारे तुम्ही..

जगदीश काकाजी तुमच्या पेक्षा वयान लहान पण आज ही त्यांना विचारूनच निर्णय घेताना तुम्हाला पाहिलं की तुमच्या भावांच्या प्रेमाचा हेवा वाटतो..

आज ही , बडीमा कडे अचानकपणे जाऊन तिची विचारपूस करणं, केदारबाबा , सोमुकाका तापडे यांच्याकडे नित्यनियमाने हजेरी लावणं हे तुमचे विशेष काम...

आज तुमची अन मम्मी ची साथ आम्हाला असल्याणे च तुमच्या सुना देखील नोकरी करू शकल्या...

रिया दिया राशी सगळ्या सगळ्या तुमचं अन आपल्या परिवाराचं नाव मोठं करत आहेत..

मग ती ज्योती- मुन्नी असो , शिल्पा - रुपाली असो वा अर्चना असो , कधी तुम्ही कोणाला दुखावलेले , मी तरी पाहिले नाही...

मनोज चे काका , जुगल, स्वप्नील, प्रसाद चे बाबा , अगदी सर्व सुनबाई आजही तुमच्या शी अगदी प्रमाणे हसून पित्या सारख बोलतात हे पाहिलं की मन भरून येतं..

एक साधा पायजमा शर्ट अन टोपी घालणारा माणूस आयुष्यात आपल्या साधेपणाने किती माणसे जोडू शकतो हे तुम्हाला पाहून कळते..

किती तरी पाय दुखत असले तरी दिवसात पाच सहा वेळा आज ही तुम्ही चाळीस पायऱ्या उतरून जातात हे मात्र मानावं लागेल...

शिल्पा , पद्मिनी भाभी , सपना यांच्या बद्दल तुम्हाला असलेला अभिमान तुमच्या डोळ्यात झळकतो..

सोन्यासारखा जावई कैलासजिजाजी च्या रूपाने शिल्पा ताई साठी शोधला त्यानाही तुमचा फार अभिमान आहे.

पप्पा आहात असेच निरोगी रहा, सदैव तुमचा अन मम्मी हा आशीर्वाद आम्हा मुलांवर असू द्यात इतकीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो