लेखात चित्र टाकणे

संपादन
 
सचिन तेंडूलकर

एखाद्या लेखात विकिमीडिया कॉमन्सवर आधीपासून उपलब्ध असलेले चित्र टाकावयाचे आहे. आपण मराठी विकिपीडियावर शोध खिडकीत शोध घेतो तसाच तिथेही घेऊन पहावयाचा फक्त इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषातून आणि शक्य असलेली वेगवेगळी स्पेलिंगस टाकून शोध घ्यावे लागतात. कारण आधीच्या व्यक्तीने संचिकेला (फाईलला) काय नाव दिले असेल हे इमॅजीन करणे जरासे कठीणच असते. यात sachin tendulkar नावाची संचिका आढळली. आता ते छायाचित्र मला मराठी विकिपीडियावर वापरावयाचे आहे. मी File हा शब्द तसाचही वापरू शकतो अथवा चित्र ने बदलू शकतो.