शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे संपादन

शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी १९५४ मध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रूपाने एका शैक्षणिक ज्ञानवृक्षाचे रोप लावले. शहरी भागात आणि खेड्यापाड्यात गोरगरिबांच्या मुलामुलींना शिक्षण मिळावे आणि समाज परिवर्तन घडावे अशा त्यागमय सेवाभावी वृत्तीने निर्माण झालेली ही शिक्षण संस्था गेली ६४ वर्षे शैक्षणिक ज्ञानदानाचे भरीव काम करीत काम करीत संस्थेचा नावलौकिक वाढवत आहेत.

बापूजींचे पूर्ण नाव गोविंद ज्ञानोजी साळुंखे. आईचे नाव तानूबाई. पण बापूजी एक वर्षांचे असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले. बापूजी लहानपणीच पोरके झाले. बापुजींचा सांभाळ त्यांच्या वडिलांनी केला.अशा अत्यन्त खडतर परिस्थितीत बापूजींनी केवळ शालेयच नाही तर महाविद्यालयीन शिक्षणही पूर्ण केले.ही गोष्ट म्हणजे एका मुंगीने मेरू पर्वत गिळण्याइतकी महाकठीण. पण बापूजींनी विद्यार्थी दशेतच ज्ञानाची समृद्धी भरभरून प्राप्त केली.