Question -

  1. What stub templates are avialable? i tried {{stub}}
  2. And yes, my editor text box displays get messed up frequently. Any idea why?

Answers:संपादन करा

  1. I have created the {{stub}} template, so now you should be able to use it.
  2. Do you use Firefox? If so, please have a look at विकिपीडिआ साहाय्य:फायरफॉक्स् मधे मराठी संकेतस्थळे. Probably it is because of not having the character encoding set to UTF-8.

--परीक्षित 03:16, 15 मार्च 2006 (UTC)


"संकेतस्थळे" हा शब्द "website" ह्या इंग्रजी शब्दाचा मराठी समानार्थी शब्द म्हणून कोणीतरी रचला आहे की काय?

"अमरकोषा"तल्या "कान्तार्थिनी तु या याति संकेतं साभिसारिका"मधल्या "संकेता"ची किंवा आपल्या मायबोलीतल्या "रानात सांग कानात आपुले नाते। मी भल्या पहाटे येते"मधल्या "राना"ची "संकेतस्थळ" हा शब्द आठवण करून देतो! तेव्हा माझ्याप्रमाणेच बहुतेक वाचकांना "संकेतस्थळे" हा शब्द विकिपीडिआ साहाय्याच्या संदर्भात गूढ रहाणार आहे अशी माझी बरीच खात्री आहे. वरच्या भावगीतातल्या "राना"सारखी "संकेतस्थळे" शोधून काढायला विकिपीडिआ साहाय्य करते की काय असाही विचार काही वाचकांच्या मनात उद्भवण्याची शक्यता आहे! तो घोटाळा टाळलेला बरा!!! (शेवटची दोन वाक्ये केवळ गमतीखातर लिहिली आहेत!)--Cgj 23:01, 15 मार्च 2006 (UTC)


आपल्याला "त्या" संकेतस्थळांची आठवण झाली हे वाचून गंमत वाटली ... मुळ भावगीतं ऐकलेली नसल्याने गोंधळ मात्र झाला नव्हता ;) असो .... संकेतस्थळ हा website ला मराठी पर्याय कोणी सुचवला याची मला कल्पना नाही, पण मराठी "संकेतस्थळांवर" (:)) हा शब्द प्रचलीत आहे. ऊदा. www.manogat.com, www.mayboli.com etc.

असे काही मराठी प्रतिशब्द सुचवणे व प्रचलीत करण्यात "मराठी ब्लोगविश्वाचाही http://marathiblogs.net/ मोठा सहभाग आहे.

असेच इतर काही मराठी प्रतिशब्द:

ब्लॉग - अनुदिनी click - टिचकी मारा यावरूनही आपणास अशीच काही विनोदी आठवण झाल्यास नक्की कळवा :)

--परीक्षित 00:04, 16 मार्च 2006 (UTC)


परीक्षित,


"संकेतस्थळ" म्हणजे नेमके काय ते माझे थोडे गूढ दूर केल्याबद्दल आभार.

माझे आणखी एक गूढ आहे. "शाश्वत दुवा" असे एक शब्दद्वय विकिपीडिआतल्या डावीकडच्या यादीत आहे. "चिरंजीव हो" असा "शाश्वती"चा दुवा --आशिर्वाद-- दुसर्या कोणाला देण्याकरता ते संकेतस्थळ आहे का?


आणि "टिचकी मारा" ह्या पर्यायाऐवजी "संगणकाला टिच्चून सांगा" हा पर्याय --किंवा "टिचवा" असा संक्षिप्त पर्याय-- कसा काय वाटतो?

--Cgj 15:25, 17 मार्च 2006 (UTC)

स्वागतसंपादन करा

आपल्या संपादन कार्यात हातभार लावत मराठी विकिपीडियात पुनःश्च आगमन प्रसंगी शुभेच्छा आणि स्वागत.आपल्या एका जुन्या प्रश्नाचे उत्तर एवढ्या उशीराने दिलेतर चालण्या सारखे आहे काय

1. What stub templates are avialable? i tried {{stub}} हा काहीसा नकारात्मक शब्द असल्यामुळे मराठी विकिपीडियावर जास्त करून आपण {{विस्तार}} हा सकारात्मक नावाचा साचा वापरत आहोत.

2. And yes, my editor text box displays get messed up frequently. Any idea why?

तुमचा हा जुना प्रश्न काय होता आणि कसा सुटला हे इतर नवीन सदस्यांना मार्गदर्शन करताना आणि सहाय्य पाने बनवताना सोईचे व्हावे म्हणून महत्वाचे आहे. अधीक स्पष्ट होऊन मिळाल्यास आपला आभारी राहीन माहितगार ०५:५३, १४ डिसेंबर २००९ (UTC)

नमस्कार Mskadu, आपण मराठी विकिपीडियावर लेखनाच्या केलेल्या प्रयत्नांकरिता अभिनंदन आणि धन्यवादही. आपली मराठी विकिपीडिया वर १० पेक्षा जास्त संपादने झाली आहेत. विकिपीडिया इतर वेबसाईट पासून भिन्न असून तो एक वस्तुनिष्ठ ज्ञानकोश आहे. आपण विकिपीडिया:नवीन सदस्यांना मार्गदर्शन का लेख पाहिलाच असेल. लेखनास जमेल तेवढे संदर्भ देणे अभिप्रेत असते. विकिपीडिया:हवे होते अपेक्षा, विकिपीडिया परीघ, आवाका आणि मर्यादा आणि विकिपीडिया:नवीन सदस्यांकडून होणाऱ्या सर्वसाधारण संपादन त्रुटी लेखांचा अभ्यास करावा. आपणास इतरही सहलेखक मार्गदर्शन करतीलच. आपल्या आवडीच्या विषयात असेच लेखन घडत राहो ही शुभेच्छा.