'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान दोन काळविटांची शिकार केल्याचा पाच जणांवर आरोप आहे.  जोधपूरजवळील कांकणी गावात १९९८ मध्ये  ही घटना घडली होती. वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत खटला दाखल करण्यात आला आहे.

कोणावर आहेत आरोप ?

काळवीट शिकार प्रकरणात अभिनेता सलमान खान याच्यासह सैफ अली खान, अभिनेत्री नीलम, तब्बू आणि सोनाली बेंद्रे यांचा समावेश आहे. 

किती वर्षांची  शिक्षा ?

काळवीट शिकार प्रकरणात वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ५१ अन्वये खटला दाखल करण्यात आला आहे. या कलमातील तरतुदीनुसार कमीत कमी १ वर्ष तर जास्तीत जास्त ६ वर्षांची शिक्षा होवू शकते.

काय आहे प्रकरण ?

'हम साथ-साथ है' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण टीम जोधपूरला गेली होती. त्यावेळी १ ऑक्टोबरच्या मध्यरात्री कांकणी गावाच्या हद्दीत दोन काळविटांची शिकार करण्यात आली. मध्यरात्री गोळीबाराच्या आवाजानंतर ग्रामस्थांना जाग आली. आणि त्यांनी अभिनेत्यांच्या गाडीचा पाठलाग सुरु केला. याच प्रकरणात सलमानला काळविटाची शिक्षा केल्याप्रकरणी दोषी ठरविण्यात आले. शिकारीच्या दोन्ही प्रकरणात हरीश दुलानी हा एकमेव जिवंत साक्षीदार होता. मात्र, सुनावणीवेळी त्याने आपली साक्ष फिरवली होती. तर सलमानव्यतिरीक्त अन्य कलाकारांना ओळखण्यास नकार दिला होता.  

दुसऱ्या शवविच्छेदन अहवालात पुष्टी  :

कांकणी काळवीट हत्या प्रकरणाचा पहिला शवविच्छेदन अहवाल वादग्रस्त ठरला होता. एका हरणाचा मृत्यू  गुदमरल्याने तर दुसऱ्या हरणाचा मृत्यू खड्ड्यात पडल्यामुळे झाल्याचे नमूद करण्यात आले होते. फिर्यादी पक्षाने अहवालावर आक्षेप घेतला होता. त्यानंतर चौकशीसाठी मेडिकल बोर्ड तयार करण्यात आले. बोर्डाने दिलेल्या दुसऱ्या शवविच्छेदन अहवालात हरणांचा मृत्यूसाठी गोळीबार प्रमुख कारण असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

किती प्रकरणात शिक्षा ?

कांकाणी गाव खटला-  सलमानला गुरूवारी दोषी ठरवले. शिक्षेची सुनावणी अद्याप बाकी आहे.

घोडा फार्म खटला - १० एप्रिल २०१६ ला सत्र न्यायालयाने ५ वर्षांची शिक्षा सुनावली होती. याप्रकरणात उच्च न्यायालयाने सलमानला निर्दोष ठरवले आहे. राज्य सरकारने निकालाविरोधात अपील दाखल केले आहे.

भवाद खटला- १७ फेब्रुवारीला याप्रकरणात सलमानला दोषी ठरवले. मात्र, उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता  केली. राज्यसरकारने निकालाविरोधात अपील दाखल केले.

आर्म्स खटला- १८ जानेवारी २०१७ ला न्यायालयाने  याप्रकरणातून सलमानची निर्दोष मुक्तता केली. 

अॅड. अशोक माने म्हणाले, की काळवीट शिकारप्रकरणी सलमान खानला एका वर्षाची शिक्षा झाली असती तर आजच त्याला जामीन मिळू शकला असता. मात्र, त्याला ३ वर्षांपेक्षा अधिक म्हणजे ५ वर्षांची शिक्षा झाली आहे. त्यामुळे आता त्याला जामीन मिळणे शक्य नाही. काही दिवस तुरुंगामध्ये शिक्षा भोगल्यानंतर तो उच्च न्यायालयात जामिनासाठी प्रयत्न करू शकतो. त्यानंतर त्याची शिक्षा आणि जामीन यांच्या आधारावर सलमान खान आपली बाजू मांडू शकतो. यावर उच्च न्यायालय जो निकाल देईल, त्यावर सलमानचे पुढील भवितव्य अवलंबून असेल. 

'हम साथ साथ है' या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणाला आता २० वर्ष लोटली आहेत. यात सलमानसह सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम या अभिनेत्रींवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, त्यांची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तर सलमान खानला दोषी ठवरवण्यात आले आहे.टाइगर अभी जेल में बंद है