संदर्भसंपादन करा

प्रथम तुमचे विकिपीडियावर स्वागत!
मी "वैजनाथ पुंडलिक" यांचा गुगल शोध घेऊन पाहिला पण मला त्या नावाचा एकही परिणाम मिळाला नाही त्यामुळे "संदर्भ हवा" हा साचा टाकला. जर वर्तमानपत्रातील लेखांमध्ये त्यांच्या संसदेच्या वास्तूरचनेबद्दलच्या कामाचा उल्लेख असेल तर तसे लिहिण्यास हरकत नाही. तुम्ही वर्तमानपत्रातील लेख स्कॅन कोठेतरी ब्लॉगवर वगैरे upload केला तर संदर्भ देणे जास्त सोयीचे होईल पण तशी सक्ती मुळीच नाही. तसेच कृपया त्या लेखांच्या कॉपीराईटचा विचार करूनच असे करा. विकिपीडिया:उल्लेखनीयता येथील संदर्भांबाबतीचे निकष पार पडतील याची काळजी घ्या. बाकी तुमच्या पुढील योगदानाला हार्दिक शुभेच्छा.- पुणेरीपुणेकर (चर्चा) २३:१३, १२ नोव्हेंबर २०१२ (IST)