नमस्कार् !!

लै मन्डली हिकडे भारी भारी लिहीतात. काही जण दूसर्यान्बद्दल फाकस्त वाईटसाईट लिवतात. त्ये प्रचालक लोक तर कायकाय ऐकुन घ्येतात. काही प्रचालक झोपा काढतात. काही प्रचालक अर्धवट लिवून समद्यास्नी टागून ठ्येवतात. त्यो लकीबाबा मध्येच हिन्दीमध्ये बडबडतो. आतातर पेपर वालेबी हायेत !!

येकन्दरीत कायबी नीट चालू नाही.

आमचा वकिल मित्र परवा ठेल्यावर भेटला व्हता. त्यो म्हनाला कि इतके वाईटसाईट लिवत असतील तर कोणीतरी बदनामीची केस करेल. मग हे लोक नही रहाणार आनी विकिपीडिया पण बन्द करायला लावतील. Facebook, Google वर केस चालु आहेच.

लय खराब वाटल ना राव. मग आलो इकडे कचरा काढायला. पण ह्ये मराठी काय जमत नाही राव. त्याच्यापेक्शा जुनी पाने परत पहिल्यासारखी लावून ठेवणे सोपे आहे. त्येच मी करून राहिलो ना भाउ. पुन्हा कोणी उल्टापालट केली तर मी परतपरत जुनी पाने परत पहिल्यासारखी लावून ठेवणार.

तर मी काय म्हन्तो, शान्तीला धरा, शान्तीला धरा !!!

नाहीतर हायेच आमची झाडाझडती !!!!