अबकारी कर किंवा अबकारी विशेष कर हा देशांतर्गत लागू करण्यात आलेला एक प्रकारचा कर आहे.तो विक्रीवर किंवा विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या विशिष्ट उत्पादनांवर लागू करण्यात येतो.विशिष्ट क्रियाकलापांसाठी देण्यात आलेल्या परवान्यावरही तो लागू केल्या जाऊ शकतो.तो कस्टम ड्युटी{सीमा शुल्क }पेक्षा बराच वेगळा आहे.अबकारी त लावण्यात आलेला कर आहे तर कस्टम ड्युटी ही देशाची सीमा पार करून आणण्यात येणाऱ्या सामानांवर लावण्यात येणारा कर(शुल्क) आहे.
अबकारी कर हा 'थेट न लावण्यात येत असलेला' (इन्डायरेक्ट) कर आहे. याचा अर्थ असा कि,विक्रेता, जो शासनास हा कर देतो, त्याने तो ग्राहकांकडुन,त्या मालाची किंमत तितकी वाढवून, वसूल करावयाचा आहे.विक्री कर किंवा व्हॅट या सारखाच हा कर मालावर लावण्यात येतो.