आज मराठी राजभाषा दिन. खरं तर मला मराठी राजभाषा असण्यानसण्यापेक्षा मराठी माझी मातृभाषा असण्याचाच जास्त अभिमान आहे. जी माझ्या मातेची भाषा आहे, ती मातृभाषा! लहानपणी आईने मराठी वाचनाची खूप गोडी लावली होती. पण पुढे पोटापाण्याच्या धांदलीत मी मातृभाषेपासून दूरावलो होतो. मात्र काय असेल ते असो, माझी सही मात्र मराठीतून केली जाते होती. माझ्या नकळत माझे मराठीपण जपले गेले होते. यामुळे व्हायचे काय की कित्येक मराठी माणसं माझ्यापाशी हिंदी इंग्लिश तोडत असताना काही अमराठी भाषिक मात्र आवर्जून माझ्याशी माझ्यापेक्षा अप्रतिम मराठीतून संवाद साधत असत. या सर्वांमुळेच मला माझी मराठी भाषा सुधारायची स्फुर्ती मिळाली व वयाच्या पंचेचाळिस वर्षांनंतर मी मराठीतून योगशास्त्रातील पदविका, पदवी व पदव्युत्तर पदवी मिळवली. अभिमान आहे मला माझ्या मातृभाषेचा!!