संधिया रंगनाथन

संपादन

संधिया रंगनाथन (जन्म: २० मे १९९८) ही भारताची एक उदयोन्मुख प्रतिभावान महिला फुटबॉलपटू आहे. ती मूळची तामिळनाडूमधील कडलूर येथील आहे. मिड-फील्डर म्हणून खेळणारी संधिया भारतीय संघाचा भाग होती, ती ने २०१९ साली काठमांडू येथील SAFF महिला चॅम्पियनशिप आणि २०१९ मधील ला नेपाळमधील पोखरा येथे झालेल्या १३व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत जेतेपद पटकावले होते.[1]  [1] इंडियन वुमन लीग (आयडब्ल्यूएल) मध्ये सेतु FC कडून खेळताना संधिया ही २०१९ मधील सर्वात मौल्यवान खेळाडू (एमव्हिपी) ठरली होती. [2][1]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

संपादन

संधिया रंगनाथनचा जन्म २० मे १९९८ रोजी तामिळनाडूतील कडलूर जिल्ह्यात झाला. तिच्या बालपणीच आईवडील विभक्त झाल्यामुळे तिला सरकारी वसतिगृहात दाखल करण्यात आले. तेथेच तिने फुटबॉल खेळायला सुरुवात केली. मोलमजुरी करणारी तिची आई महिन्यातून एकदा तिला भेटायला येत  . [3] संधियाला तिरुवल्लुवर विद्यापीठात कोच एस. मरिअप्पन यांच्याकडून उत्तम प्रशिक्षण मिळाले, सोबतच इंदिरा गांधी अकॅडमी फॉर स्पोर्ट्स अँड एज्युकेशन (कडलूर) येथेही तिने सराव केला. अभ्यासावरही तितकेच लक्ष केंद्रित करत, संधियाने तिरुवल्लुवर विद्यापीठातून एम. कॉमची पदवी प्राप्त केली आहे. [1]


कारकीर्द

संपादन

संधिया रंगनाथनने पूर्वी भारताचे कनिष्ठ स्तरावर प्रतिनिधित्व केले होते, परंतु वरिष्ठ स्तरावर तिने २०१८ मध्ये स्पेनमधील COTIF चषकात पदार्पण केले. ३० सदस्यांच्या मजबूत संघातून तिला निवडण्यात आले आणि याच स्पर्धेत तिने पहिला आंतरराष्ट्रीय गोल करत तिची निवड सार्थ ठरवली. [4]


२०१९ हे वर्ष रंगनाथनच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. दक्षिण आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने दोन गोल करता आले, आणि भारत चॅम्पियनही बनलॉ.[3] त्यापूर्वी मार्चमध्ये भारताने SAFFचे जेतेपदही जिंकले, आणि रंगनाथनने त्या स्पर्धेतही गोल केले होते. [4] [5] [6] भारतापेक्षा अधिक सरस असलेल्या उझबेकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा एकमेव गोल तिने ५२व्या मिनिटला केला, जेव्हा खेळाडू बाला [1] देवीकडून मिळालेल्या पासला तिने यशस्वीरीत्या गोल केला. [7] त्यानंतर नेपाळविरुद्धच्या एका महत्त्वाच्या ऑलिम्पिक पात्रता सामना भारताने ३-१ ने जिंकला होता, त्यातही रंगनाथनचा एक गोल होता. [8] २०१९ मध्ये देशाकडून खेळत असताना एवढे सगळे घडले, पण तिने तिच्या क्लब एफसी सेतुसाठीसुद्धा आयडब्ल्यूएलमध्ये तितकेच मोठे योगदान दिले. ती या स्पर्धेत सर्वात मौल्यवान खेळाडू (एमव्हीपी) तर ठरलीच, शिवाय तिच्या क्लबला विजेतेपदही जिंकवून दिले. [1] तिची कामगिरी इतकी चांगली होती की तिने भारतीय कर्णधार नांगनगोम बाला देवी हिचेही लक्ष वेधले. योगायोगाने देवी हीच रंगनाथनची प्रेरणास्रोत होती. [9]


आपल्या संघाला सामने आणि विजेतेपदे मिळवून देण्यासाठी गोल नोंदविण्याची आवड असलेल्या संधिया रंगनाथन आय.डब्ल्यू.एल.मुळे तिला देशातील सर्वोत्कृष्ट खेळांविरुद्ध खेळण्याची आणि स्वतःचा खेळ सुधारण्याची संधी मिळाली. २०१९मधली चांगली कामगिरी पुढेही कायम ठेवली आणि २०२०मध्येही या स्पर्धेतील दुसर्‍या क्रमांकाची सर्वाधिक गोल नोंदविणारी खेळाडू ठरली.

संधिया रंगनाथन
वैयक्तिक माहिती
Citizenship भारतीय
जन्म २० मे १९९८
Sport
Coached by एस. मरियाप्पन