महाविद्यालयाच्या उज्ज्वल परंपरेतील एन.सी.सी.चे योगदान

१२ सप्टेंबर १९६० साली भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या शुभहस्ते आपल्या महाविद्यालयाची सुरवात झाली. तो दिवस पाहण्याचा योग मला शाळेमध्ये आला. त्याच महाविद्याल्यात शिक्षण घेण्याचे भाग्य मिळाले. पुढे ३६वर्ष प्राध्यापक म्हणून व त्यातील ३०वर्ष एन.सी.सी.मध्ये कार्य करण्याची संधी मला मिळाली. हे मी माझे भाग्याच सामाझ्तो. महाविद्यालयाच्या जडणघडणीत एन.सी.सी.चे योगदान फार मोलाचे आहे असे मी सामाझ्तो. या योगदानाचा हा एक थोडक्यात आढावा आहे.महाविद्यालयाची सुरवात झाल्यावर प्रत्येक विभाग समृद्ध व्हावा असा कटाक्ष प्राचार्य दाभोल्कारांचा होतो. त्यांनी विलिंग्डन महाविद्यालयाच्या एन.सी.सी.विभागात आपले काही विद्यार्थी पाठविले. त्यावेळी "बी" कंपनीतील एक कप्तानआपल्या विभागाचा होता. त्यावेळी प्रत्येक महाविद्यालयाला एका एन.सी.सी.ऑफिसरची आवश्यकता असे. १९६२साली प्रा.दातार या उमद्या प्राध्यापकांनी ती भागविलीव आपले युनिट पूर्ण झाले. पहिला एन.सी.सी. छात्र वसंत खाडिलकर अंडर औफीसर झाला. त्यानंतर या विभागाने कधी मागे बघितलेच नाही. १९६२ च्या चिनी आक्रमानंतर भारताला आत्मासंराक्ष्णाबाबत जाग आली. तरुण मुलांना संरक्षणासाठी तयार करण्याची योजना एन.सी.सी.आर.च्या स्वरुपात आली. त्यामुळे संख्यात्मक वाढ बरीच झाली.चारशे विद्यार्थ्यांच्यापैकी निम्मे विद्यार्थी एन.सी.सी.आर मध्ये दाखल झाले. त्यामुळे एन.सी.सी.विद्यार्थ्यांची संख्या दहा पटींनी वाढली. एका छोट्या महाविद्यालयावर हा एक ताणच होता. पण दातार यांच्या कुशल नेतृत्वामुळे तो ताण सहज पेलला गेला. दोन कंपन्या म्हणजे दोनशे छात्र. त्यासाठी दोन सिनीअर अंडर ऑफिसरची आवश्यकता होती. सिनीअर अंडर ऑफिसरची नंदकुमार प्रभुदेसाई व अनिल सहस्रबुद्धे यांनी तो कार्यभाग आनंदाने स्विकारला. दोघेही उंचीने कमी असूनही १६ महाराष्ट्र बटालियन मध्ये त्याचं नावलौकीक होत. म्हणूनच १९६६साली एन.सी.सी.डायरेक्टरनी त्यांना पहिल्या अँटँचमेंट कोर्सला फिरोजपुर येथे एक महिना पाठविले होते. त्या दोघांनी तेथील प्रशिक्षण योग्य रितीने पूर्ण केले. तसेच दोघांना "सी" ‌सटिंफिकेटही मिळाले. सि.अंडर ऑफिसर अनिल सहस्त्राबुधेंना बटालियन अंडर आफिसार होण्याचा पुढे मानही मिळाला. तो महाविद्यालायाच्या दृष्टीने महत्त्वाचा बिंदू ठरला. कप्तान एस.जी.दाताराना दोन्ही कंपन्यांचे प्रशासन करणे फार त्रासाचे होत होते. म्हणून बटा.सी.अंडर ऑफिसर अनिल सहस्रबुद्धे यांना सातव्या कंपनीचे मानद ऑफिसर म्हनून नेमण्यात आले. त्याचवेळी त्यांची ऑफिसर्स ट्रेनिंगतर्फे आर्मी ऑफिसर होण्यासाठी थेट निवड करण्यात आली, तरी देखील सतत दोन वर्ष त्यांनी एका कंपनीचे नेतृत्व केले.