मंजू रानी

संपादन

मंजू रानी (जन्म २६ ऑक्टोबर १९९९) ही हरियाणाच्या रिठाल फोगाट खेड्यातील एक भारतीय हौशी मुष्ठियोद्धा किंवा बॉक्सर आहे.[1] रशियाच्या उलान-उडे येथे झालेल्या २०१९ एआयबीए महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत तिने रौप्य पदक जिंकले होते. तिने बल्गेरियातील प्रतिष्ठित स्ट्रँड्या मेमोरियल बॉक्सिंग टूर्नामेंट २०१९ मध्ये रौप्य पदक आणि त्याच वर्षी थायलंड ओपन व इंडिया ओपनमध्ये कांस्य पदके जिंकली.[3]

वैयक्तिक जीवन आणि पार्श्वभूमी

संपादन

मंजूचा जन्म २६ ऑक्टोबर १९९९ रोजी हरियाणाच्या रोहतक जिल्ह्यातील रिठाल फोगाट गावात झाला होता. सात भावंडांच्या मोठ्या कुटुंबात ती वाढली. २०१० मध्ये तिच्या वडिलांचे कर्करोगाने निधन झाल्यानंतर, घरी केवळ त्यांच्या पेन्शनमधून पैसे येत होते. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीत, कुटुंबाला कोणतीही क्रीडा पार्श्वभूमी नसतानासुद्धा, घरच्यांनी तिला पाठिंबा दिला, याबद्दल ती त्यांचे आभार मानते. बॉक्सिंग हा खेळ तिच्या गावात आधीच लोकप्रिय होता. गावातील इतर मुलींच्या पावलांवर पाऊल ठेवत मंजूने सर्वात आधी कबड्डी खेळायला सुरुवात केली होती, पण तिच्या प्रशिक्षकाने तिला बॉक्सिंगकडे वळण्याचा सल्ला दिला. २०१२ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिंपिकमधील महान भारतीय मुष्टीयोद्धा एमसी मेरी कोम हिच्या कांस्य पदक विजयाने प्रेरित होऊन रानीने बॉक्सिंगमध्ये प्रवेश केला.[1] [2]

मंजू रानीने अत्यंत खडतर आर्थिक परिस्थितीत आपल्या क्रीडा कारकीर्दीत प्रगती केली. तिच्या आईला मयत पतीच्या अल्प पेंशनवर सात मुलांचे संगोपन करायचे होते. रानी सांगते की अशा परिस्थितीत मोठे होताना योग्य आहार किंवा बॉक्सिंग ग्लोव्हजची जोडी मिळवणेही कठीण होऊन बसले होते. [1]

तथापि, २०१९च्या सुमारास तिला विविध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगल्या कामगिरीनंतर यश मिळत गेले. २० नोव्हेंबर २०२० रोजी तिने इन्फिनिटी ऑप्टिमल सोल्युशन्स (IOS) या खेळाडू व्यवस्थापन कंपनीला नोटीस पाठवत तिच्यासोबतचा त्यांचा करार संपुष्टात आणण्याची मागणी केली. तिने ऑक्टोबर 2019मध्ये या कंपनीसोबत तिचे व्यावसायिक हितसंबंध सांभाळण्यासाठी करार केला होता, मात्र त्यांनी करारातील कलमांचे पालन केले नाही, असा आरोप तिने केला. [4]

व्यावसायिक यश

संपादन

मायभूमी हरियाणामधून निवड न झाल्यावर रानी पंजाबला गेली, आणि जानेवारी २०१९मध्ये वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.[2]

फेब्रुवारी २०१९ मध्ये, तिने बल्गेरियातील स्ट्रँड्या मेमोरियल टूर्नामेंटमध्ये रौप्यपदक जिंकले. ही स्पर्धा युरोपमधील सर्वात जुन्या बॉक्सिंग स्पर्धांपैकी एक आहे, तसेच सर्वात आव्हानात्मक सुद्धा. [2]

पुढे याच वर्षी तिने थायलंड ओपन आणि इंडिया ओपन स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले. [3]

AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चँपियनशिप २०१९

संपादन

AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चँपियनशिप २०१९च्या तिच्या पहिल्याच वर्षी रानीने अंतिम फेरीत प्रवेश करत, लाइट फ्लायवेट प्रकारात रौप्य पदकसुद्धा मिळविले. एमसी मेरी कोम, जमुना बोडो आणि लवलिना बोरगोहेन यांच्यासारख्या तिच्या तिन्ही भारतीय साथीदारांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले. [2]

अंतिम फेरीत प्रवेश करताना मंजूने उत्तर कोरियाच्या अव्वल मानांकित किम हॅंग मी हिचा ४-१ असा पराभव केला.[3]

२०२४च्या पॅरिस उन्हाळी ऑलिंपिकमध्ये पदक जिंकण्याचे लक्ष्य आता रानीने तिच्यासमोर ठेवले आहे. [1]

संदर्भ

Tanuja Salunke
वैयक्तिक माहिती
Full name मंजू रानी
Nationality भारत
Citizenship भारतीय
जन्म २६ ऑक्टोबर १९९९
रिठाल फोगाट गाव, जिल्हा रोहतक, हरियाणा
Sport
खेळ बॉक्सिंग
  • रौप्य पदक: २०१९ AIBA महिला जागतिक बॉक्सिंग चँपियनशिप, उलान-उडे, रशिया
  • रौप्य पदक: २०१९ स्ट्रँडजा मेमोरियल बॉक्सिंग टूर्नामेंट, बल्गेरिया
  • कांस्यपदक: २०१९ भारत मुक्त
  • कांस्यपदक: २०१९ थायलंड ओपन