🌿🌿संधी व त्याचे उपप्रकार:

जोडाक्षरे:

ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येवून शेवटी त्यात एक स्वर मिसळतो यास ‘जोडाक्षर’ म्हणतात.

उदा.

विद्यालय : धा : द + य + आपश्चिम  : श्चि : श + च + इआम्ही   : म्ही : म + ह + ईशत्रू     : त्रू : त + र + ऊ संधी:

जवळ जवळ आलेले दोन ध्वनी जोडण्याला संधी म्हणतात. संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि शेवटच्या शब्दातील पहिला वर्ण एकमेकात मिसळून त्या दोहोबद्दल एकच वर्ण तयार होतो याला संधी असे म्हणतात. संधी म्हणजे एक प्रकारची जोडखरेच होय. 

उदा.

ईश्र्वरेच्छा    = ईश्र्वर + इच्छासूर्यास्त    = सूर्य + अस्तसज्जन     = सत् + जनचिदानंद     = चित् + आनंद

संधीचे मुख्य तीन प्रकार आहेत.

स्वरसंधीव्यंजन संधीविसर्गसंधी 

1. स्वर संधी –

एकमेकांशेजारी येणारे वर्ण हे जर स्वरांनी जोडले असतील तर त्यांना ‘स्वरसंधी’ असे म्हणतात किंवा एक पाठोपाठ एक येणारे दोन स्वर एकत्र होण्याच्या क्रियेला स्वरसंधीअसे म्हणतात.

क) दिर्घत्व संधी –

सजातीय र्‍हस्व किंवा दीर्घ स्वरमिळून एकच दीर्घ स्वर तयार होतो त्याला दीर्घत्व संधी म्हणतात.

उदा.

सूर्यास्त = सूर्य+अस्तहिमालय = हिम+आलयप्रश्नार्थी = प्रश्न+अर्थीवृद्धाश्रम = वृद्ध+आश्रमहरीश = हरी+ईशगिरीश = गिरी+ईशकविच्छा = कवी+ईच्छागुरूपदेश = गुरु+उपदेशदेवालय = देव+आलयमहेश = मही+ईशचंद्रास्त = चंद्र+अस्तविद्यार्थी = विद्या+अर्थीगुरूपदेश = गुरु+उपदेशभूदधार = भू+उद्धारगणाधीश = गण+अधीशमहिंद्र = मही+इंद्रविद्याभ्यास = विद्या+अभ्यासस्वप्नाभास = स्वप्न+आभासगजानन = गज+अनानमिष्टान्न = मिष्ट+अन्न

ख) आदेश संधी –

दोन विजातिय स्वर एकत्र येऊन तयार होणार्‍या संधीला आदेश संधी म्हणतात.

आदेश संधीचे खालील प्रकार पडतात.  i) गुणादेश –

अ किंवा आ या स्वरापुढे जर इ किंवा ई स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ए हा स्वर येतो, जर उ किंवा ऊ हा स्वर आल्यास तर त्या दोहोंऐवजी ओ स्वर येतो आणि जर ऋ हा स्वर आल्यास तर त्या दोहोस्वरांमिळून अर येतो यालाच गुणादेश संधी असे म्हणतात. 

उदा.

ईश्वरेच्छा = ईश्वर+ईच्छागणेश = गण+ईशमहोत्सव = महा+उत्सवचंद्रोदय = चंद्र+उदयदेवषा = देव+ऋषीमहर्षी = महा+ऋषीयथेष्ट = यथा+इष्टरमेश = रमा+ईशधारोष्ण = धारा+उष्णराजर्षी = राजा+ऋषीमहेश = महा+ईशसूर्योदय = सूर्य+उदयगंगोदक = गंगा+उदकसुरेंद्र = सुर+इंद्रभुपेंद्र = भूप+इंद्रवसंतोत्सव = वसंत+उत्सव

ii) वृद्ध्यादेश –

जर अ आणि आ या स्वरापुढे ए किंवा ऐ स्वर आल्यास तर त्याबद्दल ऐ हा स्वर येतो आणि ओ किंवा औ स्वर आल्यास तर त्याबद्दल औ हा स्वर येतो. यालाच वृद्ध्यादेश (वृद्धि+आदेश) संधी म्हणतात.

उदा.

एकैक = एक+एकमतैक्य = मत+ऐक्यसदैव = सदा+एवजलौध = जल+ओधगंगौध = गंगा+ओधक्षणैक = क्षण+एकप्रजैक्य = प्रजा+ऐक्यहातौटी = हात+ओटी

iii) यणादेश –

जर इ, उ, ऋ, (र्हास्व किंवा दीर्घ) या स्वरांपुढे खालीलपैकी कोणताही विजातीय स्वर आल्यास तर इ-ई या विजातीय स्वराऐवजी य हा वर्ण येतो, उ-ऊ विजातीय स्वराऐवजी व हा वर्ण येतो. ऋ या स्वराऐवजी र हा वर्ण येतो आणि पुढील स्वर मिसळून यणादेश संधी तयार होते.

उदा.

प्रीत्यर्थ = प्रीति+अर्थइत्यादी = इति+आदीअत्युत्तम = अति+उत्तमप्रत्येक = प्रति+एकमन्वंतर = मनू+अंतरस्वल्प = सु+अल्प

iv)  विशेष आदेश –

जर ए, ऐ, ओ किंवा औ या संयुक्त स्वरांपुढे अनुक्रमे ए या संयुक्त स्वराऐवजी आय्, ऐ या संयुक्त स्वराऐवजी आय्, ओ या संयुक्त स्वराऐवजी अव्, औ या संयुक्त स्वराऐवजी आव् असे वर्ण मिसळून आदेश तयार होऊन त्यास पुढील स्वर मिसळून विदेश आदेश संधी तयार होते.

उदा.

नयन = ने+अनगायन = गै+अनगवीश्वर = गो+ईश्वरनाविक = नौ+इक

ग) पूर्वरूप संधी –

मराठीत केव्हा केव्हा संधी होत असतांना एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिला स्वर कायम राहतो व दुसर्‍या स्वराचा लोप होतो. या संधीला पूर्वरूप संधी असे म्हणतात.

उदा.

नदीत = नदी+आतकाहीसा = काही+असाकेलेसे = केले+असेलाडूत = लाडू+आतखिडकीत = खिडकी+आत

घ) पररूप संधी –

केव्हा केव्हा एकत्र येणार्‍या दोन स्वरांपैकी पहिल्या स्वराचा लोप होतो व दूसरा स्वर कायम राहतो. अशा प्रकारच्या संधीला पररूप संधी असे म्हणतात.

उदा.

करून = कर+ऊनघामोळे = घाम+ओळेघरी = घर+ईनुमजे = न+उमजेएकैक = एक+एकसांगेन = सांग+एन

2. व्यंजनसंधी –

दोन व्यंजने किंवा यापैकी दूसरा वर्ण स्वर असेल तर त्याला मिळून तयार होणार्‍या संधीला व्यंजनसंधी असे म्हणतात. 

व्यंजनसंधीचे खालील उपप्रकार पडतात. क) प्रथम व्यंजन संधी –

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण ग, ज, ड, द्, ब (मृदु व्यंजन) यांच्यापैकी आल्यास तर संधी होत असतांना त्याचे जागी त्याच वर्गातील पहिले व्यंजन (क, च, ट, त, प) येऊन संधी होते त्याला प्रथम व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

वाक्चातुर्य = वाग्+चातुर्यषट्शास्त्र = षड्+शास्त्रविपत्काल = विपद्+कालवाक्पति = वाग्+पतिक्षुत्पिपासा = क्षुध्+पिपासाशरत्काल = शरद्+कालवाक्तांडव = वाग्+तांडवआपत्काल = आपद्+काल

ख) तृतीय व्यंजन संधी –

दोन शब्दाची संधी होत असतांना पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण क, च, ट, त, प यापैकी कोणताही वर्ण आल्यास त्यापासून संधी होत असतांना त्या वर्णाचे जागी त्याच वर्गातील तृतीय व्यंजन येते या संधीलातृतीय व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

वागीश = वाक्+ईशवाग्देवी = वाक्+देवीअजंत = अच+अंतवडानन = वट्+आननसदिच्छा = सत्+इच्छाअब्ज = अप्+जसदाचार = सत्+आचारसदानंद = सत्+आनंद

ग) अनुनासिक संधी –

पहिल्या पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापूढे अनुनासिक आल्यास त्याच वर्गातील अनुनासिक व्यंजन संधी होते त्यास अनुनासिक व्यंजन संधी असे म्हणतात.

उदा.

वाड्निश्चय = वाक्+निश्चयषण्मास = षट्+मासजगन्नाथ = जगत्+नाथसंमती = सत्+मतीसन्मार्ग = सत्+मार्गतन्मय = तत्+मय

घ) त ची विशेष व्यंजन संधी –

या बाबतची विशेष संधी अशी की जर त या व्यंजनापुढे – – च किंवा छ आल्यास तर त बद्दल च येतो. – ट किंवा ठ आल्यास ट बद्दल ट येतो. – ज किंवा झ आल्यास त बद्दल ज येतो. – ल् आल्यास त बद्दल ल् येतो. – श आल्यास त बद्दल च होतो व पूढील श बद्दल छ येतो.

उदा.

सच्चरित्र = सत्+चरित्रउच्छेद = उत्+छेदसज्जन = सत्+जनसट्टिका = सत्+टीकाउल्लंघन = उत्+लंघनसच्छिष्य = सत्+शिष्यउज्ज्वल = उत्+ज्वलतल्लीन = तत्+लीन

ड) म ची संधी –

म पुढे स्वर आल्यास तो स्वर मागील म मध्ये मिसळून जातो. जर व्यंजन आल्यास म बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो.

उदा.

समाचार = सम्+आचारसंगती = सम्+गतीसमाप्त = सम्+आप्तसंताप = सम्+तापसंक्रमण = सम्+क्रमणसंचय = सम्+चय

3. विसर्ग संधी –

विसर्ग संधीचे खालील प्रकार पडतात. क. विसर्ग उकार संधी –

विसर्गाच्या पुढे पाच गटापैकी कोणतेही मृदु व्यंजन आल्यास विसर्गाचा उ होतो व तो मागील अ मध्ये मिसळून त्याचा ओ होतो. याला विसर्ग उकार संधी असे म्हणतात.

उदा.

यशोधन = यश+धनमनोरथ = मन:+रथअधोवदन = अध:+वदनतेजोनिधी = तेज:+निधीमनोराज्य = मन:+राज्यअधोमुख = अध:+मुख

ख. विसर्ग-र-संधी –

विसर्गाच्या मागे अ किंवा आ खेरीज कोणताही स्वर असून पुढे मृदु वर्ण आल्यास विसर्गाचा र होऊन संधी होणे.

उदा.

निरंतर = नि:+अंतरदुर्जन = दु:+जनबहिरंग = बहि:+अंगबहिव्दार = बहि:+व्दार

ग. विसर्ग र संधी –

विसर्ग र संधी होत असतांना विसर्गाच्या मागे अ, आ खेरीज कोणताही स्वर आल्यास त्या विसर्गाचा र होतो जर दूसरा वर्ण असल्यास यावेळी पहिल्या र चा लोप होतो व त्याच्या मागील स्वर र्‍हस्व असल्यास दीर्घ होतो.

उदा.

नीरस = नि:+रसनीरव = नि:+रव

घ.

विसर्गापुढे च्, छ, ट, त, प, यापैकी कोणताही वर्ण आल्यास विसर्गाच्या जागी श, ष, व, स येऊन संधी होते.

उदा.

दुश्चिन्ह = दु:+चिन्हशनैश्वर = शनै:+चरनिश्चय = नि:+चयदुष्टीका = दु:+टीकानिस्तेज = नि:+तेजचक्षु: = चक्षु:+तेजअधस्तल = अध:+तलमनस्ताप = मन:+तापनिष्फळ = नि:+फळनिष्काम = नि:+काम

ड.

विसर्गाच्या पुढे क, ख, प, फ यापैकी कोणतेही व्यंजन आल्यास विसर्ग स्थिर राहतो.

उदा.

रज:कण = रज:+कणअध:पात = अध:+पातअंत:पटल = अंत:+पटलतेज:पुंज = तेज:+पुंज 🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿🌿