डिघोळ देशमुख

    डिघोळ देशमुख हे रेणापूर तालुक्यातील,लातूर जिल्ह्यातील एक गांव आहे.गावाजवळ मांजरा नदी व डिघोळ देशमुख नदी या नद्यांचा संगम होतो.गावातील सोमलिंगाचे मंदिर प्रसिद्ध आहे.हे गाव मांजरा नदीच्या काठावर वसले आहे. मांजरा धरणाच्या पाण्यावर येथील शेती अवलंबून आहे.डिघोळ देशमुख व डिघोळ देशपांडे अशी एकत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आहे. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 9 आहे.गावाजवळच मोटेगाव व भोकरंबा या नद्यांचा संगम होऊन डिघोळ नदी तयार होते,हि नदी पुढे मांजरा नदीस मिळते यातील सर्व पाणी कारसा पोहरेगाव बंधाऱ्यात जाते.