इनामदार हे  एक  बिल्डर आहेत हे मला माहिती होते परंतु जेव्हा डेंटल कॉलेज ची इमारत पाहिली तेव्हा मला त्यांची प्रगल्भ व्यावसायिक कुशाग्रबुद्धी  

प्र कर्षाने  जाणवली .त्याचे   बाह्य स्वरूप , पक्के बांधकाम ,देखणे  प्रवेशद्वार  चकमकीत  काळ्याभोर संगमरवरी  फरशांची जमीन , आणि वेगवेगळ्या  विभागांचे

व्यवस्थापन पाहून तर माझी   माती गुंग झाली . आकाशाला भिडणाऱ्या बांधकामाचे आजचे दर लक्षात घेता या बांधकामाला दर चौरस  फुटासाटी केवळ  ३००-३५०

रुपये  खर्च  आल्याचे सांगितले तेव्हा तर माझ्या आश्चर्याला परावरच राहिला नाही .

                 इ . स.  २०००- २००१ चे मौलाना आझाद अवॉर्ड पुणे कॉपोरेशनने श्री  इनामदारांना जाहीर केले व ते माझ्या हस्ते देण्यात आले त्यावेळी मी इनामदारांना दुसऱ्यांदा  भेटलो .मौलाना  आझादांचे व इनामदारांचे  शैक्षणिक बाबतीतील  विचार इतके मिळते जुळते होते कि ते अवॉर्ड अगदी योग्य माणसालाच दिले गेले आहे . याची खात्री  पटली  .इतर खाती सोडून मौलानांनी मंत्रिमंडळात शिक्षण खाताईच पसंत केले होते . त्यांनी शिक्षणाला दिलेल्या नवीन दिशेमुळे सर्व राष्ट्राचे शैक्षणिक दृश्यच बदलले देशाचे संरक्षण व एकटा यांचा मेल घालून आदर्श शिक्षण पद्धतीचा सकारात्मक दृष्टीने विचार करण्याची दिशा दाखविण्याची दूरदृष्टी असण्याचे श्रेय त्यांच्याकडेच जाते. या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये कोणताही भेदभाव न करता ज्ञानोपासना करण्यासाठी संधी उपलब्ध होतात