राज्य सरकारी कर्मचारी यांच्या जुनी पेन्शनच्या महत्त्वाच्या मुद्दासाठी..!!
चलाे पुणे..!! चलाे पुणे..!!
एकच मिशन..!! जुनी पेन्शन..!!
राज्य सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे यासाठी या आग्रही मागणीसाठी उमेशभाऊ शिंपी यांचे एक दिवसाचे लाक्षणिक उपाेषण.
शिक्षक संघर्षाच्या इतिहासातील एक संघर्ष नायक व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे संस्थापक अध्यक्ष परमपूज्य आचार्य कै. भा. वा. शिंपी गुरूजी यांचा वारसा लाभलेले त्यांचे सुपूत्र उमेशभाऊ शिंपी यांनी त्यांचे कार्य यशस्वीरित्या पुढे नेण्याचे ठरविले आहे. परमपूज्य आचार्य कै. भा. वा. शिंपी गुरूजी यांचेबाबत सांगायचे म्हणजे पंचावन्न वर्षापूर्वी शिक्षकांच्या पेन्शनसाठी शासनाशी दाेन हात करून गुरूजीनी निकराचा लढा दिला होता, त्याला यश प्राप्त हाेऊन समस्त प्राथमिक शिक्षक बांधवांना जुनी पेन्शन योजना लागू करणे शासनाला भाग पडले. म्हणूनच शिंपी गुरूजीना पेन्शनचे उन्दाते म्हणून संबोधन्यात येते. त्यांच्या कार्याची महती जुन्या काळी पूर्ण महाराष्ट्रभर पसरली. ताेच जिव्हाळयाचा तोच जुन्या पेन्शनचा मुद्दा घेऊन उमेशभाऊ मैदानात उतरले आहे. त्यांचे पाठीमागे महाराष्ट्रातील परमपूज्य आचार्य कै. भा. वा. शिंपी गुरूजीवर निस्वार्थी प्रेम करणारे त्यांचे खंदे प्राथमिक शिक्षक व पदाधिकारी या पुण्याच्या लाक्षणिक उपाेषणला उपस्थित राहून व जाहिर पाठिंबा देऊन संप यशस्वी करण्याचा चंग बांधला आहे, आज दिवसभर मी उमेशभाऊ बराेबर हाेताे. जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या एकाच प्रामाणिक हेतूने ते उपाेषणास बसणार आहे हे माझ्या लक्षात आले. सरकारी नाेकरीमध्ये कार्यरत नसताना नवीन सरकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे हि अाग्रही भूमिका घेऊन 18 जिल्ह्य़ातील मृत नवीन सरकारी कर्मचारी यांची कुटुंबीय यांची व्यथा जाणून घेतली व मृत कर्मचारी यांच्या वारसाला सध्या काहीच मिळत नाही हे पाहून त्यांचे मन व्यथित झाले हाेते. म्हणून त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला. उपाेषणामध्ये त्यांनी जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे या महत्वाच्या मुद्दासह मृत् कर्मचारी यांचे कुटुंबीयांना विनाअट व विनापरतावा तातडीची एकरकमी 10 लाख रूपये मदत देण्यात यावी. (सानुग्रह अनुदान नव्हे तसेच जुनी पेन्शनचे सर्व हक्क अबाधित ठेऊन) या महत्वाच्या आग्रही मागणीकरिता परमपूज्य आचार्य कै. भा. वा. शिंपी गुरूजी या संघर्ष नायकाच्या 3 अॉक्टाेबर च्या जयंतीचे निमित्त साधून उमेशभाऊ शिंपी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे एक दिवसाचे उपाेषण करणार आहेत, राज्यभरातील तसेच मुख्यत पुणे जिल्हयातील सर्व नवीन व जुने राज्य सरकारी कर्मचारी यांनी उपोषणाच्या दिवशी उपस्थित रहावे हि नम्र माझी नम्र विनंती. परमपूज्य आचार्य कै. भा. वा. शिंपी गुरूजी यांच्या कार्याचा चांगला वारसा लाभलेले एक चांगले व्यक्तिमत्व आम्हा सर्व नवीन कर्मचारी यांनी लाभले हे आम्ही सर्व नवीन कर्मचारी कधी विसरू शकत नाही, त्यांचा कार्याला माझा मानाचा मुजरा व सलाम... जय संघटना.
तुमचा आजचा संघर्ष..!!
उद्याचे सामर्थ्य निर्माण करू शकतो..!!
लाेककल्याणासाठी जनआंदोलन..!!
उपाेषण स्थळ -
मंगळवार - दिनांक ३ अॉक्टोंबर २०१७, वेळ - सकाळी १० ते ५
जिल्हाधिकारी कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत समाेर, विधानभवन, पुणे.
# संताेष आंबटकर, D.M.E. & D.A.E.
उपाध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, पुणे जिल्हा शाखा.
सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पाटबंधारे व सार्वजनिक बांधकाम कर्मचारी संघटना, पुणे जिल्हा शाखा.
@ Whatsapp & Telegram Number - 8793000345.