मी इयता ११ मध्ये शिकत आहे. मी चिंतामणराव व्यापार महाविद्यालयात शिकत आहे . चिंतामणराव व्यापार महाविद्यालय सांगली ची स्थापना २० जून १९६० रोजी झाली .तीच एका अतिशय पवित्र व मंगलमय वातावरणात . आपल्या सांगलीच्या दानशूर व पद्मभूषण श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन राजेसाहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य जनतेने व व्यापार उदिमातील जाणकारांनी 'गौरवनिधी' जमवला, त्यात श्रीमंत राजेसाहेबांनी स्वत;ची एक लक्ष रुपयांची भर घातली आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीला या ठिकाणी व्यापार महाविद्यालय सुरु करण्याचे आवहान केले . यासंदर्भात त्यावेळीच्या 'रोटरी क्लब ऑफ सांगली ' ने पुढाकार घेतला आणि हा रोटरीचा एक महात्व्कांशी शक्षणिक केंद्र म्हणून ज्या धुरीणना सांगली येथे व्यापार महाविद्यालय सुरु व्हावे ' हि मोठी दूरदृष्टी दाखवली, त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणे आमचे आद्यकर्त्यव्य आहे .