"रणदेवीवाडी"

कागल तालुक्यातील सावगाव म्हणजे आत्ताचे सांगाव. या गावाला भारतीय स्वातंत्र्य संग्रामात फार मोठे स्थान आहे. गावात स्वातंत्र्य सैनिकांची संख्या मोठी आहे. गावाचा म्हणून एक इतिहास आहे. याच गावातील काही लोकं गावाच्या बाहेर मळ्यात जाऊन राहिली. त्या मळ्याला पुढे रणदेवीवाडी असे नाव मिळाले. या वाडीचा सुध्दा एक इतिहास आहे पण काळाच्या उदरात अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात. कागल तालुक्यातील पूर्व भागातील छोटीशी वाडी म्हणजे रणदेवीवाडी. गावची लोक संख्या १२०० गावातील मुख्य व्यवसाय शेती आणि चांदी व्यवसाय. वाडी ही अगदी वाडी सारखी. गावाच्या मध्यभागी ग्रामदेवता म्हसोबाचे मंदिर, मंदिराच्या उजव्या बाजूला पाण्याचा आड (विहिर),आडाला लागून मोठ पिंपळाचे मोठे झाड, पिंपळाखाली मारूतीच छोटसं मंदिर, त्याला लागून लगेचच तालिम. एखाद्या मराठी चित्रपटाला शोभेल असे हे छोटेसे गाव.गावाला उत्तरेला असणारा प्रचंड मोठा असा माळ. आज या माळरानावर ५ स्टार एम.आय.डी.सी दिमाखात उभी आहे.हा सगळा माळ इंदूमती राणी सरकारांचा त्यांनी गावातील समस्त मागासवर्गीय लोकांना उदरनिर्वाहासाठी दिलेला. गावचे ग्रामदैवत श्री. म्हसोबा असे जुनी जाणती लोकं सांगतात. गावचा हा म्हसोबा सोन्याचा होता. देवळातील घंटा सुध्दा सोन्याच्या होत्या. एकदिवस चोरट्यांनी डल्ला मारला. आणि गावचा म्हसोबा चोरीला गेला. देवळातील देव परत मिळावा म्हणून गावातील लोकांनी जंग जंग पछाडले पण चोर काही सापडला नाही. त्या चोराने फक्त देवच चोरला नव्हता तर एक उज्ज्वल असा सांस्कृतिक इतिहास चोरला होता. https://www.icbse.com/schools/vidya-mandir-randeviwadi-772e03