*बाळदीगाव*
       बाळदी हे गाव यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव आहे. उमरखेड पासून 5 किलोमीटर अंतरावर आहे.या गावातील लोकसंख्या 3555 आहे.या गावातील वयोवृध्द माणसांची लोकसंख्या 1000 च्या जवळपास आहे.पिर बाबा हे या गावातील प्रसिद्ध दैवत आहे. शेती हा या गावचा मूलभूत व्यवसाय आहे.प्रामुख्याने या गावात हळद आणि कापूस हे पिके घेतली जातात.त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या पालेभाज्या देखील घेतल्या जातात.बाळदी या गावात पानमळे देखील घेतले जात होते म्हणजेच नगवेलीच्या पानाचा व्यवसाय या गावात मोठ्या प्रमाणात केला जात होता परंतु काही अडचणींमुळे हा व्यवसाय दिवसेंदिवस कमी होत आहे.