श्री.पांडुरंग अरुण थोरात इंदापूर तालुक्यातील लोणी देवकर हे त्यांचं छोटस गाव याच गावात प्रगती विद्यालय माध्यमिक शाळेत मॅट्रिक्स पर्यंत शिक्षण घेतलं महाविद्यालयीन शिक्षण मात्र बारामतीला टी सी कॉलेज म्हणून पंचक्रोशीतील प्रसिद्ध असणाऱ्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात संख्याशास्त्र या विषयातून पूर्ण केलं तेही सर्व मित्रांना एकत्र घेऊन.
    महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना हा पठ्या स्वतंत्र संख्याशास्त्र विषयाचे शिकवणी वर्ग पण चालवत असे उदरनिर्वाहासाठी नाही पण शिकवण्याची आवड होती म्हणून तरीही काही पैसे जमा झालेच तरी ज्या विद्यार्थ्यांच्या घरी दिवाळी होत नव्हती तिथं मात्र हा दिवाळीचा खाऊ न चुकता फटाक्यांसाहित पाठवणार हा याचा आवडता उपक्रम त्याशिवाय दिवाळीला घरी जाणार नाही.
    आज मितीला हा वहाग पुण्यात स्पर्धा परीक्षा बरोबर गावाकडे आपलं 'शिवराज ऍग्रो प्रॉडक्ट्स' म्हणून उभारलेल एक छोटंसं दिवसाला ३० टनाची क्षमता असणार घुराल चालवतो आणि तोच या घुरालाचा कार्यकारी संचालक पण आहे आणि पंचयक्रोशीतील शेतकरी पण त्याच्यावर खूप खुश आहेत कारण सहकारी जरी असले तरी डबघाईली आलेले साखर कारखाने शेतकऱ्यांची करीत असलेली लूट कमी करण्याचा आणि शेतकऱ्यांना त्यांचा उसाचा योग्य मोबदला मिळवून देऊन सामाजिक कार्यात आपला खारीचा वाटा आज मितीस तो देत आहे भविष्यात हाच व्यक्ती इंदापूरच्या विकासात आपला मोठा सहभाग देइल हे मात्र नक्की....