द्राक्ष पिकाच्या वर्तमानकाळातील व्यवस्थापनात भविष्यकाळातील समस्यांची बीजे रोवली जातात. केवळ व्यवस्थापनातील कळत नकळत घडणार्या चुकामुळे द्राक्ष वेलीची रोग प्रतिकारक क्षमता लक्षात न घेता कीटकनाशकांचा वापर केल्यास परिणाम न मिळणे तसेच जमिनीच्या प्रति प्रमाणे आणि वेलीच्या गरजेनुसार खतांचा वापर योग्य पद्धतीने न झाल्यास अनेक विकृतीचा सामना करावा लागतो. रासायनिक निविष्ठांच्या वापरामुळे अनेक क्षणीक फायदे होतात परंतु दुरोगामी परिणाम किती कठोर आहेत याचा देखील विचार करणे गरजेचे आहे एप्रिल छाटणी नंतरचे व्यवस्थापन त्याच बरोबर छाटणीपूर्व नियोजन आणि छाटणीनंतरचे व्यवस्थापन करतांना ठराविक उद्दिष्टे ठेऊन काम केले जाते. परंतु ते उद्दिष्ट साध्य न झाल्यास पुन्हा त्याच समस्यांचा सामना करावा लागतो. मग काम करतांना व्यवस्थापनातील किरकोळ चुकामुळे संपूर्ण नियोजनावर पाणी फिरते. प्रत्येक येणा-या समस्येचे मॉंनिटरिंग शेतकर्यांना करता यावे, प्रत्येक समस्यांच्या मुळापर्यंत द्राक्ष शेतकरी (बागायतदार ) पोहचवा आणि मुख्य कारणापर्यंत पोहचल्यानंतर त्याची दिशा त्यांना मिळावी. त्या दृष्टीकोनातून शेतकर्यांना मार्गदर्शनपर संकेतस्थळ देतांना आनंद होत आहे.
संपर्कासाठी http://nashikgrapes.blogspot.in/
नाशिकग्रेप्स द्राक्षाच्या निर्यातक्षम उत्पादनासाठी अत्यंत उपयोगी सन्केतस्थळ
गेल्या काही वर्षात नाशिक, सांगली, पुणे, सोलापूर आदि महत्वाच्या पट्ट्याबरोबर विदर्भ, मराठवाडयातहि द्राक्ष शेती विस्तारलेली आहे, याचे महत्वाचे कारण म्हणजे द्राक्ष हे नगदी पिक आहे. योग्य लागवड व्यवस्थापन असेल, तसेच निर्यातक्षम माल पिकवला, तर हे पिक चांगले नफा देऊन जाते. या पिकाने छोट्या शेतकर्यालाहि सन्मान मिळवून दिला आहे. राज्यातील द्राक्ष बागायतदारांनी युरोपची अवघड बाजारपेठ आपल्या आवाक्यात आणली आहे, त्याचबरोबरीने जागतिक बाजारपेठेत महाराष्ट्राचा वेगळा ठसा या पिकाने उमटवला आहे, त्याचे सर्व श्रेय बागायतदारांचे आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादन देशात प्रथम क्रमांकावर आहे; परंतु येत्या काळात केवळ लागवड वाढून उपयोग नाही, तर प्रती हेक्टर नफा कसा वाढेल, याकडे सर्वांना लक्ष द्यावे लाणार आहे. यासाठी नव्या बागायतदारांनी पीक व व्यवस्थापन नेमके कसे करायचे हे समजावून घेणे गरजेचे आहे. द्राक्षतून चांगला नफा मिळवायचा असेल, तर या पिकाचा सर्व अंगाने शास्रशुद्द अभ्यास आणि स्वत:च्या नोंदी ठेऊन त्यानुसार पिक व्यवस्थापनात बदल करणे गरजेचे आहे. अलीकडील काळात द्राक्ष बागायतदारला हवामानाच्या विविध समस्यांनासामोरे जावे लागते आहे, त्यातून हिमतीने मार्ग काढायचा आहे नवीन बागायतदारांची द्राक्ष लागवडीची तयारी असते; परंतु त्याला लागणारे योग्य मार्गदर्शन कसे मिळेल,हा प्रश्न त्यांचासमोर असतो. या सर्व गोष्टींचा विचार करून हे संकेतस्थळ तयार केले आहे. संकेतस्थळच्या माध्यमातुन शेतकर्याला द्राक्ष लागवड तंत्र, छाटणीचे तंत्र, बागेचे व्यवस्थापण, कीड-रोग नियंत्रण,खत-पाणी व्यवस्थानातील मुद्दे, बेदाणा, वाईन बाजारपेठ,निर्यातीचा संदर्भातील माहितीचा, तसेच रीकट आणि खरड छाटणी कशी करावी याबाबतचे मुद्दे समजावून देण्याचा प्रयत्न केला आहे. या संकेस्थळातून व्यवस्थापनाचे मार्गदर्शन आपल्या मिळेलच, त्याचबरोबरीने व्यापारी, उद्योजक आणि द्राक्ष शेतीशी संबधीत सर्व उद्योगघटकांनाहि यातून चार गोष्टी निश्चितच उपुयक्त ठरतील, द्राक्ष पिकामध्ये दररोज बदल होत असतात, त्यानुसार शेतकऱ्यांनी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, त्यासाठी हे संकेतस्थळ निश्चीतच उपुयक्त ठरेल, असा मला विश्वास वाटतो.