ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली(महाराज)पठाडे,कर्जतकर.


हे एक महाराष्ट्रातील नामवंत युवा वारकरी कीर्तनकार आहेत.समाजप्रबोधनकार आहेत.

जन्मतारीख-१०-०८-१९९७

जन्मगाव-अळसुंदे, ता-कर्जत. ,जि-अहमदनगर.

पत्ता- माऊलीनगर-अळसुंदे रोड,कर्जत,ता-कर्जत,जि.अहमदनगर

शिक्षण-एम.ए.मराठी

कार्य- १)कर्जत येथे भव्य दिव्य श्री विठ्ठल रुक्मीणी ,श्री ज्ञानोबाराय,श्री तुकोबाराय यांचे मंदीर निर्माण करून मंदीरासमोर छत्रपती शिवाजी महाराज,धर्मवीर संभाजी महाराज,स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याची स्थापना करून भव्य संस्थान निर्माण केले.

२)२००४ पासून ते आजपर्यंत १७ वर्षे महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर जिथेजिथे वारकरी संप्रदाय आहे.,उदा.कर्नाटक,तेलंगणा,आंध्रप्रदेश,गुजरात,मध्यप्रदेश तिथे तिथे कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य चालू आहे..

३)आत्तापर्यंत ५००० पेक्षा जास्त कीर्तने करून गावागावात हरिनाम सप्ताह सुरू करणे,अनेक तरुण माळकरी करणे,वारकरी तत्व सांभाळणारे युवक घडविण्याचे कार्य करतात.

४)महाराजांच्या कीर्तनाचे विशेष गुण म्हणजे.. ज्ञानेश्वरी,गाथा,भागवताच्या विचाराबरोबर कीर्तनामध्ये बोलता बोलतां यमक जुळवण्याची कला,मार्मिक विनोद,कीर्तनातील पहाडी चाली,सामाजिक व आध्यात्मिक तत्वांचा मिलाफ,शिव-शंभू चरीत्र,इ.


कीर्तनाच्या माध्यमातून अध्यात्माबरोबर समाजप्रबोधनाचे कार्य चालू आहे.उदा.,स्रीभृण हत्या,हुंडाबंदी,व्यसनमुक्ती,स्वच्छता अभियान,वृक्षसंगोपन,युवा पिढीला मार्गदर्शन इ.

५)श्री तुकोबाराय पालखी सोहळ्यात दिंडीचे नेतृत्व ते करतात.

६)२०२० साली अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या महाराष्ट्र राज्य युवा प्रमुख पदी निवड..

७)Zee टॅाकीज या जगप्रसिद्ध वाहिनीवर तब्बल १५ वेळेस कीर्तन करून वारकरी संप्रदायाचा प्रचार केला.

८)You Tube,facebook सोशल मिडीयाच्या माध्यमातून महाराज घराघरात पोहचले आहेत. महाराष्ट्रात माऊली महाराजांचे असंख्य चाहते आहेत.


९)श्री ज्ञानोबा तुकोबा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून रक्तदान,गणेशोत्सव,शिवजयंती,संस्कार शिबीराचे आयोजन,कर्जत येथे राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवांचे आयोजन इ.कार्यक्रमाचे आयोजन करतात.

१०)महाराष्ट्रातील युवा वारकऱ्यांचे नेतृत्व करून,धार्मिक ,संप्रदायिक,सामाजिक कार्यात विशेष सहभाग..