कॉंग्रेस व्यवस्था -
                      विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील सामाजिक शक्तींच्या रचनेमध्ये सापडतात. इतर अनेक राज्याप्रमाणे ब्राह्मण - वर्चस्वाच्या चौकटीत महाराष्ट्राचे राजकारण सकारात होते. पण शेतकरी जातीमधील राजकीय जागृती  जातीच्या मुद्द्यावर झालेली सामाजिक घुसळण आणि राज्याच्ता मोठ्या भागावर रायत वारीमुळे आणि छोट्या शेतकऱ्यांच्या अस्तीवामुळे सरंजामी संबध यांना मर्यादा निर्माण झाली. व ब्राम्हण श्रेष्ठी जणांच्या पलीकडे महाराष्ट्रात राजकीय व सामाजिक सत्तेची केंद्रे निर्माण झाली.परिणामी १९३० च्या दशकात राज्यातील लोक्सहभागाचे आणि राजकीय नेतृत्वाचे सामाजिक स्वरूप बदलण्यास सुरवात झाली. या प्रक्रियेतून कॉंग्रेस पक्षाचे स्वरूप बहुजातीय बनले.आणि राजकीय स्पर्धा हि खुद्द कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत देखील आकार घेत राहिली. 

भाषावार प्रांतरचनेच्या चळवळीमधून राजकारणाला कलाटणी मिळालेल्या राज्यांपैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. तसेच देशाती एक प्रगत राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्राचा भाग मुंबई होण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेन मोठा लढा दिला.या लढ्यामुळे मुंबई महाराष्ट्राला मिळाली आणि यामुळे महाराष्ट्राच्या विकासात मोलाची भर पडली. पण यामुळे काही राजकीय प्रश्न देखील निर्माण झाले.वसाहतपूर्व काळापासून भारताच्या राजकारणावर महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांचा खूप मोठा प्रभाव पडला आहे. १९ व्या शतकात अनेक सामाजिक व राजकीय घडामोडींमुळे व समतेच्या जातिभेदाच्या व स्त्री पुरुष समतेच्या मुद्द्यांवर भर देऊन महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळ हि सर्वाधिक महत्वाची आहे.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विसाव्या शतकातील राजकीय व वैचारिक क्षेत्रातील कर्तुत्वामुळे महाराष्ट्र हा एक पुरोगामी व सुधारणावादी समाज म्हणून ओळखला जातो.स्वतंत्र उत्तर काळात महाराष्ट्राची ओळख 'कॉंग्रेसचे राज्य ' अशीच राहिली आहे. १९५२ च्या निवडणुकीपासून २०१४ पर्यंत मधला [१९७८ -१९७९] आणि १९९५ -९९ ] काळ सोडला तर कॉंग्रेसचे सरकार राहिले '.कॉंग्रेस व्यवस्थेचे 'एक उत्तम उदाहरण म्हणून महाराष्ट्रातील राजकारणा कडे पाहता येईल.या व्यवस्थेत अल्हाच्या ओघात स्थित्यंतरे देखील आहेत.वेळोवेळी धक्के खात अखेरीस विलयाला गेली का हा प्रश्न २०१४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीने निर्माण झाला.