याचे उत्तम उदाहरण म्हणजे आझम कॅम्पस मध्ये आय. टी. संबंधी असलेल्या एका सेमिनारमध्ये मी प्रमुख पाहुणा म्हणून होतो. त्यावेळी मी इनामदारांना सुचविले की मुलांना जर इंटरनेट व माइक्रोबॉयॉलॉजीच्या सोयी उपलब्ध करून दिल्या तर त्यांची बौ द्धक  क्षमता आणखी वाढेल. थोडयाच दिवसात माझ्या सूचनेची अंमलबजावणी झाली, हे ऐकून मला खूप आनंद वाटला. आझम मधल्या कुठल्याही संस्थेत जात,जमात धर्म याला प्राधान्य न देता केवळ गुणवत्तेच्या जोरावर माणसांची पारख केली जाते. हे इनामदारांचे चातुर्य आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे डेंटल कॉलेजचे प्राचार्य श्री . कौल होत. ते काश्मीरी ब्राह्मण आहेत . अशा तर्हेच्या पध्दती जर आपण सर्व शैक्षणिक व अशैक्षणिक संस्थांमध्ये अवलंबिल्या शिवाय सर्व जगाला मान्य होणारी सामाजिक व्यवस्था आपण निर्माण करू शकणार नाही .

          मला इनामदारांना अशी सूचना करावीशी वाटते की त्यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांची विशेषतः तांतिक शिक्षण संस्थांमधील शिक्षकांची गुणवत्ता सतत वाढत कशी राहील  याकडे लक्ष पुरवावे. शिकविणे ही सतत वृद्धिंगत होणारी कला आहे.  शिक्षकांनी मन लावून स्वतःची गुणवत्ता वाढवून अद्ययावत ज्ञान मिळविण्याकडे जर दुर्लक्ष केले तर कुठल्याही संस्थेची अपेक्षित वाढ होणे शक्य होणार नाही.