- १) माझ्याकडे प्रचालक आणि स्विकृती आधीकारी/(प्रशासक) या मराठी विकिपीडिया समुदायाने दिलेल्या बिरुदावल्या असल्यातरी,विकिपीडियावर अधिकाधीक गोष्टी सदस्यांनी स्वतः किंवा आपापसात चर्चा करून पुढाकार घेऊन सक्रीयपणे धसास लावणे अभिप्रेत असते.
- २) घाई न करता विषयाबद्दलच्या मला समजू शकतील अशा अधीकाधीक बाजूंचा(परस्पर विरोधी सुद्धा) शक्य तेवढा सांगोपांग विचार करण्यास पुरेसा अवधी मिळावा
- ३) इतर सदस्यांना माझ्या दृष्टीकोणाने प्रभावित न होता आपले म्हणणे मोकळेपणाने मांडण्यास पुरेसा कालावधी मिळावा , तसेच एखाद्दा विषयाची वेगवेगळी मतांतरे पुढे येऊन मलाही माझे दृष्टीकोण मांडण्यापुर्वीच अभ्यासता आणि तपासता यावेत.
- ४) जो पर्यंत इतर सदस्य आणि प्रचालक काम करत असतात आणि अगदीच इमर्जंसी स्थिती नसते तो पर्यंत हस्तक्षेप करणे मी सहसा टाळत आलो आहे.अपवाद फक्त प्रताधिकार विषयक उल्लंघन आढळल्यास ते काढण्यात सक्रीय आढळू शकतो,खरे तर हेही काम पूर्ण पणे सर्व सदस्यांच्या अखत्यारीतच येते, विकिपीडियाच्या धोरणामुळे तसे करण्या वाचून बर्याचदा प्रत्यवाय नसतो गैर समज बाळगू नयेत.
- ५) मला सविस्तर दिर्घ उत्तरे देण्याची सवय आहे त्यास अधीक वेळ लागतो जुने सदस्य थांबू शकतात आणि एखादा वादविवादात नंतर सहभागी होता येते पण नवागत सदस्यांच्या शंका निरसनास वाली न आढळल्यास माझा सहसा प्रयत्न नवागत सदस्याच्या शंका निरसनास प्राधान्य देण्याचा कल असतो.सोबतच विकिपीडिया मुल्यांचा अभ्यास आणि विकिपीडिया मुल्यांना प्रमोट करनाऱ्या ॲक्टिव्हिटी, सहाय्य पाने, पॉवर पॉईंट प्रेझंटेशन्स,वृत्तपत्रिय लेखन,विकिपिडियास सशक्त बनवू शकणाऱ्या स्ट्रॅटेजीक गोष्टी आणि फिल्डवर्कला अलिकडे माझा वेळ जातो त्यात क्वचित डेडलाईन असल्यामुळे एखाद्दा विषयास लगेच न्याय देणे होत नाही.
- ६)मी व्यक्तिगत कार्यातही व्यस्त असू शकतो हे खरे आहे, त्यामुळे पुरेसा ऑनलाईन वेळ देणे शक्य होईलच असे नाही आणि त्या संदर्भाने नोंद माझ्या सदस्य पानावर केली आहे.आपली टिका मत मनमोकळे पणाने आणि सविस्तर मांडल्यास स्वागतच असेल.
मी अशी नोंद सहसा माझे सदस्य नाव एखाद्दा चर्चेत उल्लेखीले गेले,चर्चेत सहभागी होण्याची विनंती एक किंवा अधीक व्यक्तिंनी केली किंवा अगदीच गंभीर वळणाची चर्चा चालू आहे , आणि हे महाशय विकिपीडिया अथवा इंटरनेटवर दिसत आहेत मग या चर्चेस का वेळ देत नाहीत ? असा काही जणांना प्रश्न पडत असतो.असे गैर समज होऊ नयेत असा उद्देश आहे.मी ही सामान्य मनुष्यच आहे सर्व काळी सर्व गोष्टींना वेळ न्याय देऊ शकेनच असे नाही पण जसे आणि जेवढे घडेल तेवढे नक्की करेन.