संत नरहरी सोनार


संत नरहरी सोनार श्री संत नरहरी सोनार यांचा जन्‍म देवगिरी येथे झाला. त्‍यांचे वडिल दिनानाथ परंपरागत सोनार काम करीत ते श्रीमंत होते. पुढे ते पंढरीस येवून स्‍थायिक झाले. संत नरहरी सोनार कट्टर शिवोपासक होते. ते पंढरीत असून कधीही पांडुरंगाच्‍या दर्शनास गेले नाहीत. एकदा एका सावकाराने पांडुरंगासाठी सोन्याचा करदोडा करण्‍यास सांगितला. त्‍यांनी तो सुंदर बनवून दिला. सावकाराने तो करदोडा पांडुरंगाच्‍या कमरेस बांधण्‍याचा प्रयत्‍न केला तेंव्‍हा तो खूपच मोठा झाला तेव्‍हां सावकाराने प्रत्‍यक्ष पांडुरंगाचे कमरेचे माप घेण्‍यासाठी संत नरहरी सोनार यांना आग्रह धरला. ते कट्टर शिवोपासक असल्‍याने पांडुरंगाचे दर्शन नको म्‍हणून त्‍यांनी डोळयास पट्टी बांधून कमरेचे माप घेण्‍याचा प्रयत्‍न केला असता त्‍यांच्‍या हातास स्‍पर्श झाला त्‍यावेळी त्‍यांना हातास पिंडीचा स्‍पर्श झाला व पट्टी काढून पहातात तर श्री पांडुरंगाची स्मित हास्‍य करणारी मूर्ती दिसली. असा बर्‍याचवेळा त्‍यांना अनुभव आल्‍यानंतर शिव व विष्‍णु दोघे एकच; दोघात व्‍दैत नाही याची साक्ष पटली. पुढे ते पांडुरंगाचे निस्सीम भक्‍त झाले. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती. नरहरी सोनाराच्या नावावर फार थोडे अभंग उपलब्ध आहेत. 'सवंगडे निवृत्ती सोपान मुक्ताई' 'शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा' माझे प्रेम तुझे पायी' आणि देवा तुझा मी सोनार | तुझे नामाचा व्यवहार' अभंग प्रसिद्ध आहेत. नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.' नरहरी सोनार म्हणतात, 'देवा, मी तुझा सोनार आहे, आणि मी नेहमी तुझ्या नामाचाच व्यवहार करीत असतो. फुललेल्या निखाऱ्यांची शेगडी-बागेसरी म्हणजे माझा देह आहे. त्यात जीवाशिवाचं सोनं घातलेलं आहे. सत्त्व, रज, तम या तीन गुणांची मूस मी तयार केली आहे आणि त्यात ब्रह्मारस ओतला आहे. जीवाशिवाच्या फुंकणीनं मी या धगधगत्या आगीत, ती शिलगावण्यासाठी, फुंक मारतो आहे. म्हणून त्यात माझ्या अंतरात्म्याचं सोनं तावून-सुलाखून निघतं आहे. त्या तप्त झालेल्या सुवर्णाला रात्रं-दिवस, ठोकाठोकी करून मी आकार द्यायचा प्रयत्न करतो आहे.' आपल्या सर्व शक्ती, कौशल्य आणि तन-मन-धन अर्पून आपण स्वीकारलेले काम निष्ठापूर्वक केले, तर यश, कीतीर्, वैभव आपल्या पायाशी लोळण घेणारच आहे. म्हणूनच 'यात अर्थ नाही, त्यात अर्थ नाही' असे म्हणत बसण्यापेक्षा जे काम स्वीकारले आहे, त्यालाच दिव्यत्वापर्यंत नेण्याचा चंग बांधला, आणि सर्व शक्ती व मन एकवटून त्यावरच लक्ष केंदित केले, तर कोणत्याही व्यवसायातून अद्भुत वाटावे असे चमत्कार घडू शकतात, हे आपण आज जगात पाहतो आहोत. हे आपणही करू शकतो, ही भावना मनात जागी झाली, तर स्वकर्मात रत राहूनही दिव्यत्वाची प्रचिती येऊ शकते. यादवकालीन संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. व्यवसाय करणारेही संत आहेत. गोरोबा (गोरा कुंभार), सावतोबा (सावता माळी) यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. विविध वाड्.मयेतिहासात त्यांचा 'नरहरी सोनार' असा उल्लेख केला जातो. वारकरी संप्रदायाच्या संत नामावलीतील बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. ते विविध व्यवसाय करीत असल्यानं त्यांच्या लेखनात विविध व्यवसायांतील शब्द आले व त्यामुळंही मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली. (तिचा शब्दकोशही समृद्ध व संपन्न झाला.) यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक 'वैष्णव' या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी 'हरिहरैक्यां'ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला. ज्ञानदेवांचे वडील बंधू निवृत्तिनाथ हे नाथसंप्रदायिक होते व तेच ज्ञानदेवांचे गुरुही होते. त्यामुळं ज्ञानदेव गुरुपरंपरेनं नाथसंप्रदायिक होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलोपासक असल्यानं वैष्णव होते. म्हणजे ज्ञानदेव घराण्याच्या परंपरेनं वैष्णव होते, वारकरी होते.


नरहरी सोनार वारकरी संप्रदायातील संत नरहरी सोनार प्रथम शैवपंथी होते. पण एकदा शिव आणि विठ्ठल एकच आहेत असा साक्षात्कार झाला आणि त्यांनी आपला जीवनमार्ग विठ्ठलमय करून टाकला. रामचंद्रदास कृष्णदास हरिप्रसाद मुकुंदराज मुरारी अच्यूत आणि नरहरी अशी त्यांची वंशपरंपरा सांगण्यात येते. नरहरीच्या पत्नीचे नाव गंगा व मुलांची नावे नारायण व मालू अशी होती.


यादवकालीन संत मंडळात विविध जातीजमातीचे संत आहेत. व्यवसाय करणारेही संत आहेत. गोरोबा (गोरा कुंभार), सावतोबा (सावता माळी) यांच्या नावातच त्यांचा व्यवसायही दडला आहे. नरहरी महाराज हे सुवर्णकार जातीतले होते. विविध वाड्.मयेतिहासात त्यांचा 'नरहरी सोनार' असा उल्लेख केला जातो.

वारकरी संप्रदायाच्या संत नामावलीतील बहुतेक संत प्रपंच करीत परमार्थ साधनाही करीत होते. ते विविध व्यवसाय करीत असल्यानं त्यांच्या लेखनात विविध व्यवसायांतील शब्द आले व त्यामुळंही मराठी भाषा समृद्ध व संपन्न झाली. (तिचा शब्दकोशही समृद्ध व संपन्न झाला.)

यादवकालात शिवांचे (शंकराचे) उपासक 'शैव' आणि विष्णूचे (विठ्ठलाचे) उपासक 'वैष्णव' या दोन्ही संप्रदायांचा विशेष प्रभाव होता. या दोन्ही संप्रदायांतील जे समताभिमानी होते, त्यांच्यापैकी काही जणांमध्ये अन्य मतांबद्दल व संप्रदायाबद्दल दुरावाही होतो. ज्ञानदेवांनी शिव आणि विष्णू ही एकाच परमेश्वराची नावं आहेत, अशी 'हरिहरैक्यां'ची समन्वयवादी भूमिका घेतली. त्यामुळं या दोन्ही संप्रदायांतील दुरावा व एकमेकांविषयीचा भेदभाव नाहीसा झाला. त्याचं एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून नरहरी महाराजांच्या जीवनाचा उल्लेख करायला हवा.

ज्ञानदेवांनी जी शैव आणि वैष्णव यांच्यामधील एकात्मतेची अपेक्षा केली, ती नरहरी महाराजांनी प्रत्यक्ष आपल्या आचरणाद्वारे पूर्ण केली. ते प्रारंभी नाथ संप्रदायिक (शिवोपासक) होते. 'कटिसूत्र' प्रसंगानंतर ते वारकरी (विठ्ठलोपासक) झाले, कारण त्यांना शिव आणि विष्णू यांच्यामधील अभेद जाणवला. ज्ञानदेवांचे वडील बंधू निवृत्तिनाथ हे नाथसंप्रदायिक होते व तेच ज्ञानदेवांचे गुरुही होते. त्यामुळं ज्ञानदेव गुरुपरंपरेनं नाथसंप्रदायिक होते. त्यांचे वडील विठ्ठलपंत हे विठ्ठलोपासक असल्यानं वैष्णव होते. म्हणजे ज्ञानदेव घराण्याच्या परंपरेनं वैष्णव होते, वारकरी होते.

ज्या 'कटिसूत्र' (कडदोरा) प्रसंगानं नरहरी महाराजांना शिव आणि विठ्ठल यांच्या मधील अभेद जाणवला, त्या 'कटिसूत्र' प्रसंगाचं / अख्यायिकेचं आकलन आपण करून घ्यायला हवं. त्यामुळं नरहरी महाराजांनी ज्ञानदेवांची हरिहरैक्याची भूमिका का स्वीकारली, याचा उलगडा होईल. ही घटना/ आख्यायिका अशी आहे - देवगिरीच्या एका सावकारानं विठ्ठलमूर्तीला 'कटिसूत्र' (कडदोरा) अर्पण करायचं ठरविलं व ते काम त्यानं नरहरी महाराजांकडे सोपविलं. महाराज शैव असल्यानं ते विठ्ठल मंदिरात जात नव्हते. विठ्ठल मूर्ति दर्शन त्यांना निषिद्ध वाटत होतं. त्यामुळं त्यांनी त्या सावकारालाच मूर्तीच्या 'कटिसूत्रा'चं माप आणायला सांगितल. त्यानुसार नरहरी महाराजांना त्या सावकारानं माप आणून दिलं. नरहरी महाराजांनी त्यानुसार 'कटिसूत्र' तयार केलं. पण ते चार बोटं सैल झालं. मग, विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं नाही म्हणून स्वत: नरहरी महाराजचं डोळ्यांवर पट्टी बांधून मूर्तीच्या 'कटिसूत्रा'चं माप घेऊ लागले. तेव्हा विठ्ठलमूर्ती ही शिवमूर्ती आहे, असं त्यांना जाणवलं. डोळ्यांवरील पट्टी काढल्यावर पुन्हा ती विठ्ठलमूर्तीच असल्याची प्रचिती त्यांना आली. त्यामुळं 'हरी' आणि 'हर' हे एकच आहेत, हे चिरंतन सत्य त्यांना जाणवलं. त्याविषयी ते पुढील अभंगात म्हणतात.

शिव आणि विष्णू एकचि प्रतिमा। ऐसा ज्याचा प्रेमा सदोदित। धन्य ते संसारी, नर आणि नारी। वाचे 'हरी हरी' उच्चारीत।।

नाही पैं भेद, अवघा मनीं अभेद। द्वेषाद्वेष- संबंध उरी नुरे। सोनार नरहरी न देखे द्वैत। अवघा मूर्तिमंत एकरूप।।

'नरहरी' नावाचे एकूण नऊ संतकवी वेगवेगळ्या कालखंडात होऊन गेले असले तरी नरहरी सोनार हे यादवकालीन ज्ञानदेवांच्या व नामदेवांच्या प्रभावळीतील प्रमुख संत कवी असल्याचं संशोधनान्ती मान्य झालं आहे. भाषिक व ऐतिहासिक प्रमाणांच्या आधारे चिकित्सा केल्यावर नरहरी महाराजांच्या अभंगांची संख्या चाळीस ते पन्नास अभंग इतकीच असावी असं मानलं जातं. मौखिक परंपरांचा आणखी धांडोळा घेतल्यास आणखी भर पडू शकेल, असं अनुमान करता येतं. असं असूनही नरहरी महाराजांची उपलब्ध असलेली निर्मिती अल्प असूनही तिनं आपलं वैशिष्ट्य नि वेगळंपण सिद्ध केलं आहे, हे दुर्लक्षून चालणार नाही. आपला व्यवसाय व संसार चांगल्या प्रकारे करीत असताना नरहरी महाराजांनी आत्मचिन्तन केलं नि आत्मशोध घेण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी त्यांना कशाची जाणीव झाली ?

'जग हे अवघें सारें ब्रह्मरूप। सर्वांभूती एक पांडुरंग। अणुरेणुपर्यंत ब्रह्म भरियेलें। सर्वांघटीं राहिलें अखंडित।। विश्व हें व्यापिलें भरूनी उरलें। कवतुक दाविलें मायाजाळ भ्रांती मायाजाळ काढता तात्काळ। परब्रह्मीं खेळे अखंडित।। अखंडित वस्तु हृदयी बिंबली। गुरुरुपे पाही नरहरी।।

ही जाणीव म्हणजेच ज्ञानदेवांनी 'ज्ञानेश्वरी'त प्रतिपादिलेला 'चिद्विलासंवाद' होय. या परब्रह्माची प्राप्ती आपल्याला कशी होईल? यासाठी साधना करायला हवी . ही साधना करताना अनुताप, संसाराविषयी विरक्ती नि परमात्म्यास शरणागती या विविध अवस्थांतून ते जातात आणि मग-

'देह-विदेह याचा मानुनी कंटाळा। बाणलीसे कळा परिपूर्ण।। म्हणे नरहरी सोनार चरणीं दृढ भाव। अवघा भासे देव जळी -स्थळीं।।

अशी साक्षात्काराची अवस्था त्यांना प्राप्त होते आणि मग त्यांचा प्रपंच नि व्यवसाय परमार्थरूप होतो. 'देवा, मी तुझा सोनार' किंवा 'देह बागेसरी जाण' हे त्यांचे लोकप्रिय अभंग याच स्थितीचा प्रत्यय देतात. यापैकी दुसरा अभंग धुळ्याच्या समर्थ वाग्देवता मंदिरातील जुन्या बाडातून (बाडांक क्रं १७३३) इथं त्या संस्थेच्या सौजन्यानं छायाप्रतीच्या रुपात उद्धृत करीत आहे.


वारकरी संप्रदायामध्ये विविध जाती जमातीच्या संतांची एकत्र येऊन वारकरी संप्रदाय वाढविण्याचा प्रयत्न अठरा प्रगट जाती जमातीच्या संतानी केला आहे. यात पंढरपूर मधील संत नरहरी सोनार यांनी आपल्या भक्तीचा ठसा महाराष्ट्रभर उमठविला होता. संत नरहरी सोनार हे जातीने सोनार असल्याने त्यांचा व्यवसाय हा दागिन्यांचा होता. त्यांची कलाकुसर त्यावेळेस चांगली प्रसिद्धी होती. आपल्या कलेच्या जोरावर व्यवसायाचा पंढरपुरात चांगला जम बसविला होता. संत नरहरी सोनार हे एक प्रसिद्ध शिव भक्त होते. त्यांच्या घरात शिवभक्ती परंपरेने चालत आली होती. त्यांची भगवान शंकरावर एकनिष्ठ भक्ती होती. त्यांच्या या भक्तीची चर्चा पंढरपुरामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. रोज सकाळी उठल्यावर ते शिव आराधना करीत असे. रोज पहाटे जोतिर्लिंगावर ते बेल पत्र वाह असे. ते शिवभक्त असले तरी दुस-या देवावर त्यांची फारशी श्रध्दा नव्हती यामुळे काही जणांना त्यांच्या या वृत्तीचा राग येत असे. एके दिवशी पांडुरंगाने या भक्ताची परीक्षा घेण्याचे ठरविले. तेव्हाच गावात एका सावकाराला पुत्र झाला तेव्हा पांडूरंगला कमरेची सोन साखळी तयार करावी असे त्या सावकाराच्या मनात आले. विठ्ठलाला नवस केल्यामुळे त्याला पुत्ररत्न झाले होते. संत नरहरी सोनार हे उत्तम कारागीर असल्याने त्यांनीच ती सोनसाखळी बनवावी म्हणून ते त्यांच्याकडे साखळी बनविण्यास सांगितले. पण संत नरहरी सोनार ह्यांनी स्पष्टपणे नकार दिला याचे कारण त्यांचा पण होता की शंकाराशिवाय इतर कोणत्याही देवतांचे मुख ते बघणार नाहीत. त्यावर निरुपाय म्हणून सावकारांनीच विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून देण्याचे ठरवले. यावर संत नरहरी सोनार यांनी साखळी बनवण्यास होकार दिला. दुस-या दिवशी सावकारांनी विठ्ठलाच्या कमरेचे माप आणून दिले. संत नरहरी यांनी आपल्या कलेप्रमाणे सुंदर सोनसाखळी तयार केली. सावकार देखील सोनसाखळी पाहून खुश झाला. मंदिरात जाऊन विठ्ठलाला सोन साखळी घातली पण ती एक वीतभर जास्त झाली होती म्हणून सावकाराने आपल्या सेवकाला संत नरहरी सोनार याच्याकडे पाठविले व साखळीचे माप बरोबर करून आणण्यास सागितले. संत नरहरी सोनार यांनी साखळीचे माप त्याप्रमाने करून दिले. परंतु विठठलाला साखली घातल्यावर पुन्हा माप जास्त झाले यामुळे नरहरी सोनार गोंधळून गेले. माप बरोबर देऊनही असे कसे होत आहे या विचारात ते पडले शेवटी स्वतः मंदिरात गेले. स्वतःच्या डोळ्यावर पट्टी बांधून विठ्ठलाच्या मूर्तीसमोर गेले व सोन साखळी कमरेत घालू लागले तर त्यांच्या हाताला व्याघ्र चर्मे लागली. सोनारांचे हात गळयापर्यंत गेले तर त्यांना गळ्यात शेष नाग असल्याचे जाणविले. नरहरी सोनारांनी लगेच आपल्या डोळ्यावरील पट्टी काढली बघतात तर काय समोर विठ्ठलाचीच मूर्ती होती. पुन्हा त्यांनी डोळ्यावर पट्टी बांधली परत पुन्हा तेच. यामुळे ते खूपच गोधळून गेले. शेवटी त्यांच्या लक्षात आले की पांडुरंग परमात्माच शकर भगवान आहे. हे सर्व देव विठ्ठलातच सामावलेले आहे. यानंतर ते विठ्ठलाच्या भक्तीमध्ये बुडून गेले व पांडूरंगला म्हणाले

देवा तुझा मी सोनार । तुझ्या नामाचा व्यवहार ।।


हा लेख मी इनटरनेट वर सर्च करुन् पोस्ट केला आहे. ज्रर आपल्याकडे काही अधिक माहिती असेल तर मला जरुर कळवा. मी आपला आभारी राहिल्. संपर्क मुक्तेश्वर टाक मोबाइल नम्बर् - ८५५२८०६०१९ धन्यवाद!!!!

जय नरहरी जय !! जय सोनार !!! जय महाराष्ट्र!!!!!