महाराष्ट्र एनजीओ समिती

अध्यक्ष:युवराज येडूरे

स्थापना ०१/०८/२०१४

मुख्यालय दुसरा मजला, शाम-कला बिल्डींग कोल्हापूर-गारगोटी रोड मुदाळतिट्टा ,तालुका:भुदरगड जिल्हा:कोल्हापूर

सामाजिक तत्त्वे महाराष्ट्राचा आणि स्वयंसेवी एनजीओ सर्वांगीण विकास,

सामाजिक राष्ट्रवाद!

महाराष्ट्र एनजीओ समिती संक्षिप्त : हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक/राज्यस्तरीय सामाजिक संघटन आहे. दि:०१/०८/२०१४ रोजी ह्या सामाजिक संघटनेची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश, आणि  सामाजिक विकास यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे या संघटनेचे प्रमुख ध्येय आहे. महाराष्ट्र राज्य व स्वयंसेवी संस्थेचा विकास, महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण सामाजिक विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र एनजीओ समितीच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे.

संघटनेची ध्येय आणि धोरणे

१. महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि सामाजिक विकास यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र एनजीओ समितीचे ध्येय आहे.

२. महाराष्ट्र राज्य व सामाजिक विकास , महाराष्ट्रासंबंधीचे ज्ञान व महाराष्ट्राचा सर्वांगीण सामाजिक विकास (भौतिक व सांस्कृतिक) या गोष्टींचा विचार हा महाराष्ट्र एनजीओ समितीच्या तत्त्वांचा मूळ गाभा आहे. हा विचार प्रत्यक्षात आणण्याकरता संघटना बांधील आहे. सामाजिक संस्कृती विस्तार,भौतिक व सांस्कृतिक विकास करणे ह्या गोष्टी त्यामध्ये अंतर्भूत आहेत.

३. महाराष्ट्राच्या सामाजिक विकासार्थ काम करण्यासाठी सर्व स्वयंसेवकांना - ज्यात सर्व जातींचे, धर्मांचे, पंथांचे आणि वर्गांचे लोक आले - एकत्र करून महाराष्ट्र एनजीओ समितीच्या खाली त्यांना एकवटवणे ही गोष्ट महाराष्ट्र एनजीओ समिती आवश्यक मानते.

४. महाराष्ट्र एनजीओ समिती सामाजिक विचार मानतो. त्या सर्वांची समृद्धी आणि विकास महाराष्ट्र एनजीओ समिती महत्त्वाचा मानते.

५. महाराष्ट्राच्या व सामाजिक विकासासाठी त्याच्या आड येणाऱ्या सर्व समस्यांची सोडवणूक करणे, या विकासाआड येणाऱ्या सर्व सत्तागट, पंथ आणि समाजगट यांच्याशी सर्व पातळींवर संघर्ष करणे, यासाठी रचनात्मक व संघर्षात्मक कामांची उभारणी करणे. महाराष्ट्र एनजीओ समिती रचनात्मक कामे व संघर्षात्मक कामे यात फरक मानत नाही. ही दोन्हीही मूलत: हातात हात घालून येणारी कामे यथाशक्ति करणे.

६. सामाजिक विचाराना न्याय देताना ` महा एनजीओ डेव्हलेपमेंट असोसिएशन,ची स्थापना करण्यापासून अन्‌ महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेच्या निधी आर्थिक व कायदेशीर व्यवस्थापनाच्या माध्यमातून या साऱ्या गोष्टी एकाच वेळी रचनात्मक कामे करून व संघर्ष करून संघटनेला साध्य करायच्या आहेत.

७. महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून रस्ते, आरोग्य, व्यापार, शेती, वीज, पाणी, शिक्षण, पर्यटन, महिला, कामगार, विद्यार्थी, आदिवासी, कायदा व सुव्यवस्था, क्रीडा, उद्योग, वित्त, गृहखाते, सहकार, रेल्वे, केंद्र-राज्य संबंध या क्षेत्रांतील सर्व सामाजिक प्रश्नांची तड लावणे आणि त्यात सामाजिक संस्था, समाजसेवकांचे सर्वंकष वर्चस्व स्थापित करणे, ही संघटनेच्या कार्याची मुख्य दिशा आहे.

८. महाराष्ट्राच्या समाजकारणात तीव्र संघर्षाद्वारे  सामाजिक संस्था, समाजसेवकां साठीच महाराष्ट्र' ह्यानुसार आग्रही असणे ही महाराष्ट्र  एनजीओ समितीची विचारधारा आहे.

९. भौतिक व सांस्कृतिक समृद्धीचे शिखर गाठलेला, महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राचा सर्वांगीण सामाजिक विकास व समाजसेवक बनवणे हे महाराष्ट्र एनजीओ समितीचे स्वप्न आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यासाठीच ह्या संघटनेचा जन्म झाला आहे.

१०. महाराष्ट्र एनजीओ समितीने   महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थेचा विकास बाबत खालील ध्येयपूर्ती करण्यासाठी सर्वांगीण प्रयत्न करणे,

▶️ इतर महामंडळाप्रमाणे महाराष्ट्रातील एनजीओचे महामंडळ तयार करण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️ प्रत्येक जिल्ह्यावाईज महाराष्ट्र एनजीओ विकास केंद्र उभा करणे.

▶️महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्था एनजीओ संस्थेचे प्रश्न मांडण्यासाठी महाराष्ट्रातील विभाग वाईज ngo विधायक नेमणूक करणं खूप गरजेचा आहे .आणि त्यासाठी प्रयत्न करून महाराष्ट्र NGO समितीच्या माध्यमातून स्वयंसेवी संस्थेचे विधायक विधानसभेमध्ये पाठवण्यासाठी प्रयत्न करणे

▶️३५AC/ FCRA /१२AA/८० G नोंदणीबाबत जाचक अटी रद्द करण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️ शासकीय उपक्रमामध्ये NGO संस्थेना सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणे व शासकीय अनुदानाच्या सामाजिक कामामध्ये (NGO ना) स्वयंसेवी  संस्थेना प्रथ‌म प्राधान्य देणेसाठी प्रयत्न करणे.

▶️ ग्रामीण भागातील स्वयंसेवी संस्थाना ग्रामपंचायतमधील १५ व्या वित्त आयोग तसेच मनरेगा योजने अंतर्गत येणाऱ्या कामामध्ये गावातील स्वयंसेवी संस्था किंवा १० ते १५ कि.मी अंतरावरील स्वयंसेवी संस्थेना प्रथम प्राधान्य देण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️आदर्श गाव संकल्प प्रकल्प योजने अंतर्गत महाराष्ट्रातील येणाऱ्या गावामध्ये शासनाकडून त्याची निविदा जाहीर करून आजूबाजूला स्वयंसेवी संस्थेना काम करण्याची संधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न.

▶️ शासकीय टेंडरमध्ये स्वयंसेवी संस्थेसाठीचा वार्षिक ताळेबंद (२५ लाख, २५ कोटी) अशा जाचक अटी रद्द करून महाराष्ट्रातील नवीन स्वयंसेवी संस्थेनाही संधी देण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️ महाराष्ट्रामध्ये काम करणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या माध्यमातून C.S.R फंड हा त्या कंपन्यांनी फंड व त्याची CSR पॉलिसी जाहीर करून स्वयंसेवी संस्थेना फंड उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी महा.सी.एस.आर डेव्हलपमेंट असोसिएशन स्थापना करून महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थाना फंड उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थाचालक. स्वयंसेवक, समाजसेवक यांना सरकारच्या सर्व शासकीय योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी व त्यांना सवलती मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️ अंध, मुकबधीर, अपंग, संस्था, वृद्धाश्रम यांचेसाठी सध्याच्या महागाईप्रमाणे शासनाकडून अनुदानात वाढ करून देण्यासाठी प्रयत्न करणे.

▶️महाराष्ट्रातील स्वयंसेवी संस्थांना 12Aa/80G/FCRAव आर्थिक ,कायदेशीर बाबींमध्ये प्रशिक्षण देणे यासाठी प्रयत्न करणे आणि NGO ट्रेनिंग सेंटर उभा करणे,