मातंग समाज:-

मातंग ही महाराष्ट्रातील एक लढाऊ जात आहे. मातंग समाज्याने संगित ,कला,साहीत्य आश्या अनेक श्येत्रात हि आपले खुप मोठे योगदान दिले आहे.मातंगाचे हलगी वाजविणे हे पारंपारीक काम होते तसेच केतकीपासून (केकताडापासून) दोरखंड बनविणे हा मांगांचा मूळ पारंपरिक व्यवसाय होता. याखेरीज झाडू बनवणे, घराला शुभप्रसंगी बांधायची तोरणे बनवणे हे देखील त्यांचे पारंपरिक व्यवसाय होते. पण काळाच्या ओघात पारंपरिक व्यवसाय बंद पडून मांगांचे रोजगार बंद झाले. मातंग भारतीय संविधानाच्या कायद्याप्रमाणे अनुसूचित जाती (SC) मध्ये मोडले जातात. मातंग हा महाराष्ट्रातील एक समाज आहे. मांग जातीत किमान १२ पोटजाती आहेत. मातंग लोक प्रामाणिक, धाडशी व शूर समजले जातात. ‘भेटेल मांग तर फेडेल पांग’ असे एक वचन आहे. महाराष्ट्रात मातंग समाज हा बारा बलुतेदारांपैकी एक समजला जातो. मातंग समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रात कोकण वगळता सर्वत्र आढळते. मातंग समाज हा प्रामुख्याने हिंदुत्त्ववादी विचारसरणीचा मानला गेला आहे. महाराष्ट्रातील जातीमध्ये लोकसंख्येनूसार मातंग ही दुसरी सर्वात मोठी जात आहे.

शिवकाळ ते स्वातंत्र्यपूर्व काळ:-

मातंग समाज हा मुळचा रांगडा, आक्रमक तरीही प्रामाणिक तसेच गावचा संरक्षण करता समाज. त्यामुळेच शिवकाळात देखील गडांचे घेरे, चौक्या, पहारे तसेच काही ठिकाणी किल्लेदारीची जबाबदारीही मातंग समाजाकडे होती. स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी मातंग, रामोशी अशा आक्रमक जातींना गुन्हेगार ठरवलं. त्यांना गावांतून तडीपार केले, त्यांच्यावर खोटे आरोप लावले, तेव्हा मातंग समाजाने इंग्रजांच्या विरोधात गांवागांवातून संघर्ष केला. मातंग समाजातील आद्यगुरू श्री. लहुजी साळवे यांनी आपल्या तालमीतून कुस्त्यांचे डाव, तलवार चालविणे, लाठ्या-काठ्या चालविणे याचे प्रशिक्षण लोकमान्य टिळक, गो. ग. आगरकर, वि. दा. सावरकर, महात्मा फुले, वा. ब. फडके इत्यादींना दिले, यामंडळींच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे राहिले.

मातंग समाजातील मुख्य २५ कुळं :-

अडागळे, आवळे, माने, वाघमारे, अवघडे, बनसोडे, खंडसोडे, पोटफोडे, मोहिते, थोरात, बोराडे, गायकवाड,कुचेकर, रिटे, सोनावणे, संकपाळ, शिंदे, रणदिवे, आरणे, उबाळे, मोरे, सकट, वायदंडे, पाटोळे, बाबर, चाखले.

मातंग समाजाची सद्यपरिस्थिती :-

मातंग समाजातील बांधव आज त्यांचा परंपरागत दोरखंड तयार करणे, झाडू तयार करणे मातंगाचे हलगी वाजविणे हे काम हेही पारंपारिक काम होत्. व्यवसायांपासून अलिप्त होऊन शैक्षणिकदृष्ट्या अधिक प्रगत होऊ लागला आहे. परंपरागत शेतजमीन असलेली मातंग मंडळी आपली शेती सांभाळत आहेत. याखेरीज सरकारी, खाजगी नोकऱ्यांमध्ये तसेच उद्योजकतेकडे मातंग समाज बांधव वाटचाल करू लागला आहे एकेकाळी बेडर आणि रांगडा असलेला हा समाज इतर क्षेत्रांतही आपले रांगडेपण सिद्ध करतोय.

ध्वज:- पिवळा(मध्यभागी लालसुर्य) १९८४ ला क्रांतीसम्राट बाबासाहेब गोपले यांनी अखिल भारतीय मातंग संघ स्थापन करून मातंग चळवळ उदयास आणली व संपूर्ण मातंग समाजाला तेजस्वी प्रतीक पिवळा झेंडा देऊन आरक्षण वर्गिकरण चळवळ सुर केली व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आरक्षण वर्गिकरण चळवळ महाराष्ट्रात सुरू आहे २००३ ला लहुजी साळवे मातंग अभ्यास आयोग स्थापन करण्यात आला

....जय मातंग... ...जय लहुजी...