कसाब सांगाव
" थोर महात्मे होऊन गेले ,चरित्रे त्यांचे पहा जरा
आपण त्याच्या सामान व्हावे ,हाच सापडे बोध खरा "
कसाब सांगाव स्वातंत्र सैनकाचे गाव म्हटले जाते ,कारण स्वातंत्र काळात संगावच्या खूप लोकांचा समावेश होता .
२० ओक्टोम्बर १९४५ ला सांगाव येथे प्रजा परिशदेच्या वतीने मुक्त राजबंदाचे फार मोठे अधिवेशन भरविले होते . त्यामध्ये १९४२ च्या स्वातंत्र लाढ्यच्यावेळी
हुतात्मेयं पत्करलेल्या स्वातंत्र वीरांचे यशोगान त्याच्या कुटुंबियांना चांदीच्या ढाली अर्पन करून गायिले गेले .
मगदूम मास्तरांच्या मार्गदर्शना खाली सांगावहुन पहिला जथा आला तो महालिगा व्हायणकवरे व त्याच्या इतर चार साथीदार हातात तिरंगा घेऊन 'भारत
माता की जय,' 'वंदे मातरम 'च्या घोषणा देत रेसिडेन्शी च्या बंगल्यावर पोहचले . व त्यांना अटक केली ,जबरी शिक्ष्या व दंड केला .
असाच एक प्रसंग म्हणजे _हुपरी पार्कमधील बांगला जाळणे .या बंगल्याचा उपयोग आसपासच्या प्रजेला हैराण करणायसाठी होत होता. ९ जानेवारीला सकाळी ८-००वाजता पार्क शेजारीच लक्ष्मण माळी यांच्या मळ्यात जवळ जवळ १०० तरुण कार्यकर्त्याची मिटिंग झाली .त्यामधे दुसऱ्या दिवशी रात्री बरोबर ९ वाजता ठरल्या काम फ़त्त्य करूनच मगच उत्संग घेतला .
सांगावातील सर्व कर्मचायरी मंडळी सोसायटीत बसून सर्व चर्च्या करीत असत. त्यातच किराणा मालाचे दुकान होते . हि बातमी ब्रिटिश लोकांना समजल्यावर
त्यानी तीला आग लावली . याचा त्रास सर्वांचा भोगावा लागला व ज्या लोकांनी फितुरी केली त्याना तुरुंगातून सुटून आल्यानंतर त्यांना पेन्शिन चालू झाली .सांगाव -च्या पाष्य्वर्भूमीवर अन्यत्र दुःतिशेषप टाकला तर आपणास लक्षात येईल की ,त्यावेळी सगळीकडे फार मोठा संहार घडून आला . कोल्हापुरात बाबुराव गोखलेंच्या लाक्षिमीपुरीतील विदया -विलासासारखा स्वतंत्र लढयला वाहिलेल्या आणि ३ पिढया ज्यांनी देहदंड आणि आर्थिक झीज सोसून देशाच्या स्वतंत्र्यासाठी, स्वातंत्र्य सैनिकांसाठी सर्वोतोपरी साहाय्य केले, त्या वृत्तपत्राची कचेरीही पूर्ण भस्मसात झाली होती. त्याचप्रमाणे बालाजी पेंढारकरांचा प्रभाकर स्टुडिओ ,हरिहर विदयालय ,बापटांचा दवाखाना