सोमवंशी क्षत्रिय (वाडवळ)
शके १०६२ च्या सुमारास चंपानेरच्या प्रताप बिंबाने उत्तर कोकणावर स्वारी करून उत्तर कोकण हस्तगत केले आणि सोमवंशी क्षत्रियांचा वा भागात प्रवेश झाला. या नविन परंतु ओसाड व उद्धस्त स्थितीत असलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्यासाठी राजा प्रताप बिंबाने चांपानेर व पैठण वेचून जी ६६ कुळे आणली. त्यात २७ कुळे सोमवंशी १२ कुळे सूर्यवंशी आणि ९ कुळे शेषवंशी होती. सोमवंशी क्षत्रिय ज्यावेळी कोकणात आले त्यावेळी त्यांची सामाजिक प्रतिष्ठा पुष्कळच मोठी असावी. धार्मिक दृष्टना त्यांचे काही कुलाचार होते त्यांच्या विशिष्ट कुलदेवता होत्या. त्यांची गोत्र प्रवरे होती.