पाचवा अदभुत दिवा
एका घरात पाच दिवे जळत होते. एके दिवशी पहिला दिवा म्हणाला,'मी दिवसभर जळून
लोकांना एतका प्रकाश देतोय, पण माझी कोणी कदरच करत नाही. म्हणून मी विझून जाणच योग्य ठरेल' असं म्हणून तो दिवा विझला. पण हा दिवा काही साधासुधा नव्हता तर तो होता, उत्साहाच प्रतीक!
हे पाहून दुसरा दिवा , जो शातीचा प्रतीक होता, तो म्हणाला, 'मी शातीच प्रकाश साताताने देत असलो, तरी लोक हिंसा करतच आहेत. त्यामुळे मी प्रकाश देण व्यथ ठरत आहे.म्हणून मला विझायलाच हवं.
उत्साहाच आणि शातीचा दिवा विझेल तेव्हा हिमतीचा जो तिसरा दिवा होता तोही आपली हिमत हरवून बसला, निराश झाला आणि विझला.आता उत्साह,शाती आणि हिमत न राहिला चौथा समृदधीच्या
दिव्यानही विझण उचित समजलं.
आता चार दिवे विझल्यानतर उरलेला एक्मेव पाचवा दिवाच केवळ प्रज्वलित होता. खरे तर पाचवा दिवा सर्वात लहान असला तरीही तो निरतरपणे जळत होता.तेवढ्यात त्या घरात एका मुलाने
प्रवेश केला. त्याने पहिले 'अरेच्या !या घरात एका किमान एक दिवा तरी उजळत आहे ' असा विचार करून तो आनदित झाला.विझलेले चार दिवे पाहून तो मुळीच निराश झाला नाही. कारण त्याचा मनात
एकच आशा होती. कमीत किमी एक दिवा तर जळत आहे ! त्याने त्वरीत तो जळत असलेला दिवा उचलून इतर चार दिवे प्रज्वलित केले.हा पाचवा अनोखा दिवा कोणता होता हे आपण जाणता
का ? तो होता आशेचा दिवा !