......संत एकनाथ महाराज गवळण...!


१) काय करू बाई ग जीव हा वेडावला | सावळा मुरलीवाला आडवा आला ||धृ.||

घागर घेऊन पाणियासी जाता | पाणीयासी जाता कान्हा आम्हां अडविता ||२||

दहीदुध घेऊनी मथुरेसी जाता | मथुरेची जाता कान्हा आम्हां अडविता ||३||

एका जनार्दनी गवळण राधा | कृष्ण सख्याची जडलीये बाधा ||४||


[१]